जाहिरात

EVM वर भरोसा नाही! माजी मंत्र्यासह 10 बड्या उमेदवारांचे फेर मतमोजणीसाठी अर्ज

 पालघर जिल्ह्यात पाच उमेदवारांकडून ईव्हीएम आणि वीवीपॅडच्या फेर तपासणीची मागणी केली आहे. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन उमेदवारांचा समावेश आहे.

EVM वर भरोसा नाही! माजी मंत्र्यासह 10 बड्या उमेदवारांचे फेर मतमोजणीसाठी अर्ज

मनोज सातवी, पालघर: राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. निवडणूक निकालानंतर एकीकडे सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे या निकालावरुन विरोधकांनी मात्र ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे.

याबाबतची आता सर्वात मोठी अपडेट समोर आली असून पालघर जिल्ह्यात पाच उमेदवारांकडून ईव्हीएम आणि वीवीपॅडच्या फेर तपासणीची मागणी केली आहे. यामध्ये बहुजन विकास आघाडीच्या तीन उमेदवारांचा समावेश असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या एका उमेदवारानेही याबाबतची मागणी केली आहे. यासाठी लागणारी रक्कमही त्यांनी भरल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

नक्की वाचा:  वक्फ बोर्डाला 10 कोटी, 24 तासात निर्णय रद्द; देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्टीकरण

पालघर जिल्ह्यात पाच उमेदवारांकडून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या फेर तपासणीची मागणी केली आहे. बहुजन विकास आघाडीच्या तीनही उमेदवारांकडून निवडणूक आयोगाकडे ही मागणी करण्यात आली आहे. तर तर वसई विधानसभेतील काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील आणि विक्रमगड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सुनील भुसारा यांच्याकडूनही फेर तपासणीची मागणी करण्यात आली आहे.

निकाल लागल्यानंतर 45 दिवसांनी ईव्हीएम आणि  व्हीव्हीपॅटची तज्ञांमार्फत तपासणी होणार आहे.  तपासणीवेळी संबंधित मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि  व्हीव्हीपॅटवर पुन्हा मतदानाचे प्रात्यक्षिक केले जाणार आहे.  यासाठी प्रत्येक मतदान केंद्रामागे 40 हजार रुपये अधिक 18% GST शुल्क भरावे लागते. पाचही उमेदवारांनी याबाबतचे शुल्क भरून तपासणी अर्ज दाखल केले आहेत. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनीही कर्जत- जामखेडमधील पराभवानंतर ईव्हीएमवर शंका घेत फेर मतमोजणीची मागणी केली आहे. दुसरीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम फेर तपासणीसाठी अर्ज केला आहे. भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डीले यांनी प्राजक्त तनपुरे यांचा पराभव केला. या निकालावर संशय उपस्थित करत प्राजक्त तनपुरे यांनी फेर तपासणीची मागणी केली आहे. 

शिवसेना ठाकरे गटाच्याही अनेक उमेदवारांनी हा अर्ज केला आहे.  नाशिक पश्चिम मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर, डाेंबिवली विधानसभा मतदार संघातील पराभूत उमेदवार दीपेश म्हात्रे, उरण विधानसभेतील मनोहर भोईर यांनीही ईव्हीएमवर शंका घेत फेर तपासणीसाठी अर्ज केला असून रक्कमही जमा केली आहे.

महत्वाची बातमी: आधी घटस्फोट मग गंभीर आजार, आता वडिलांचे निधन; सुपरस्टार अभिनेत्री कोलमडून पडली

Listen to the latest songs, only on JioSaavn.com