मनोज सातवी, पालघर
Palghar Viral Video: पालघर जिल्ह्यातील विरारमध्ये एका महिला रिक्षाचालकास बेदम मारहाण झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी रात्री घडली आहे. विरार पूर्व रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा उभी करण्याच्या किरकोळ वादातून हा प्रकार घडला असून, यामध्ये महिला चालक गंभीर जखमी झाली आहे. विशेष म्हणजे, ही घटना कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांसमोरच घडली, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
Video: बिथरलेला रेडा थेट दुकानात घुसला! दुचाकीला धडक, मुलांचा जीव मुठीत, दहशतीचा थरार CCTV मध्ये कैद
महिला रिक्षा चालकाला बेदम मारहाण
मिळालेली माहिती अशी की, सिद्धी सातारकर या विरारमध्ये रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतात. मंगळवारी रात्री स्थानक परिसरात रिक्षा लावण्याच्या कारणावरून त्यांचा काही स्थानिक व्यक्तींशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संबंधित व्यक्तींनी सिद्धी यांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Virar | Viral Video | वाहतूक पोलिसांसमोरच महिला रिक्षाचालकाला मारहाण#ndtvmarathi #auto #driver #lady #fight pic.twitter.com/abISsfuOj2
— NDTV Marathi (@NDTVMarathi) March 10, 2026
व्हिडिओ व्हायरल!
या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांच्या समोरच जर अशी घटना घडत असेल, तर सामान्यांचे काय? असा सवाल नागरिक विचारत आहेत. विरार पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
नक्की वाचा - Rapido bike ban: रॅपिडोला सरकारचा दणका! थेट परवानाच रद्द, काय घडलं, कारण काय?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world