वर्ध्याच्या नितेश कराळे मास्तरांनी आर्वी व वर्धा या दोन मतदारसंघासाठी उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे मागितली होती. त्यासाठी त्यांनी रितसर इच्छुक उमेदवारी मागण्यासाठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या होत्या. यापैकी वर्धा मतदारसंघ हा महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यात काँग्रेसच्या वाटेला गेला. तर आर्वी मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला गेला.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मात्र ऐन वेळेवर नितेश कराळे मास्तरांना उमेदवारी न देता आर्वी येथील खासदार पत्नी मयुरा अमर काळे यांना उमेदवारी देण्यात आल्याने नितेश कराळे मास्तरांनी आपल्याच पक्षावर घराणेशाहीचा आरोप केला आहे. राष्ट्रवादीच नाही तर जो कोणताही पक्ष घराणेशाही करेल त्याला माझा विरोध असणारच असेही कराळे मास्तरांनी म्हटलं. असं म्हणत नितेश कराळे मास्तरांनी खदखद व्यक्त केली.
( नक्की वाचा : अमित की आदित्य? ठाकरे बंधूपैकी कोण जास्त श्रीमंत? निवडणूक प्रतिज्ञापत्रात झालं उघड )
पक्षाने एकाच घरात खासदार व आमदार या दोन्ही उमेदवारी कशा दिल्या. सामान्य कार्यकर्त्यांनाही महत्व असलं पाहिजे. त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, असं म्हणत मास्तरांनी आपल्याच पक्षातील उमेदवारांवर घराणेशाहीचा आरोप केला आहे. नितेश कराळे यांनी पक्षावर टीका करताना प्रवक्ते पद गेलं तरी आपण भीत नसल्याचे स्पष्ट केलं.
(नक्की वाचा- "...तर महाराष्ट्राला कुणीही वाचवू शकणार नाही", फोडाफोडीच्या राजकारणावर राज ठाकरे काय म्हणाले?)
भाषणांसाठी फी द्यावी लागेल
निवडणुकीमध्ये माझ्यावर अन्याय झाला आहे. आर्वी मतदारसंघावर मी दावा केला होता परंतु खासदार अमर काळे यांनी हा मतदारसंघ आपल्याच पत्नीसाठी ठेवल्याने जनता देखील नाराज आहे. यासंदर्भात शरद पवारांशी मी बोलणार असल्याचे सुद्धा कराळे मास्तराने सांगितले होते. सोबतच आता यापुढे माझे भाषण ठेवायचे असल्यास फी द्यावी लागेल, असेही त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्पष्ट सांगून टाकले आहे.