साजन दाबे, वाशिम:
Washim Election News: महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुरळा सुरु आहे. राज्यातील 264 नगरपालिका, नगरपंचायतींचे मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत उमेदवारी नाकारलेल्या नेत्यांनी थेट बंडखोरी केल्याचे समोर आले. आता या बंडखोरांविरोधात भारतीय जनता पक्षाने कठोर कारवाई केली आहे. वाशिममध्ये पक्षशिस्त मोडणाऱ्या 16 बंडखोरांवर भाजपकडून निलंबन करण्यात आले आहे.
भाजपची मोठी कारवाई!
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाशिमनगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कठोर कारवाई केली असून पक्षशिस्त मोडणाऱ्या १६ बंडखोरांचे निलंबन केले आहे. अधिकृत उमेदवारांविरोधात उमेदवारी दाखल केल्याने या सर्वांचे निलंबन करण्यात आले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे.
Pawar Plan: महायुतीला 'पवार प्लॅन'चा धक्का? शिंदे-भाजप एकत्र, पण अजित पवारांची नवी खेळी उघड
या १६ बंडखोरांना पुढील सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा, शहर व विविध आघाडीतील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. महिला मोर्चा, युवा मोर्चा, उत्तर आघाडीतील पदाधिकारी यांच्यावर की कारवाई करण्यात आली असून भविष्यात पक्षविरोधी भूमिका घेतल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
16 बंडखोरांवर कारवाईचा दणका!
निलंबित सदस्यांमध्ये जिल्हा चिटणीस करूणा कल्ले, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री छाया पवार, माजी नगरसेवक प्रभाकर काळे, माजी युवा मोर्चा अध्यक्ष वैभव उलेमाले, सदस्य राजेश विश्वकर्मा, आशा खटके, गजानन ठेंगडे, माजी जिल्हा उपाध्यक्ष धनंजय हेंद्रे, वाशिम शहर उपाध्यक्ष संगिता पिंजरकर, मदन राठी, मुकेश चौधरी, अनंत रंगभाळ, उत्तर आघाडी प्रकोष्ठाचे सावंतसिंग ठाकूर, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ सेलचे प्रमुख सचिन पेंढारकर, महिला शहर उपाध्यक्ष अनिता इंगोले आणि गजू लांडगे यांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world