राज्यावर पाणी संकट, धरणातील साठा फक्त 28 टक्के

Advertisement
Read Time: 1 min
मुंबई:

राज्यभरात उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. उष्णतेचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे राज्यातल्या वेगवेगळ्या प्रकल्पातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे पाण्यात मोठी घट झाली आहे. राज्यात मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पाणीसाठा अवघ्या 28 टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राज्यातील सध्या 2 हजार 344  गावे व 5 हजार 479 वाड्यांना 1 हजार 952 टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे उन्हाचा तडाखा असाच राहिल्यास पाणीपुरवठ्याची स्थिती आणखी चिंताजनक होऊ शकते. राज्यात या सर्वाचा फटका  पुणे आणि छत्रपती संभाजीनगर विभागात पाहायला मिळत आहे. या दोन्ही विभागातील पाण्याची स्थिती सर्वात जास्त गंभीर आहे. त्यामुळे ऐन मे महिन्यात इथली पाण्याची स्थिती आणखी गंभीर होऊ शकते. 

हेही वाचा - शिरूरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी, जनता नेत्यासोबत की अभिनेत्यासोबत?  

विभागातील धरणांचा पाणीसाठा

नागपूर विभाग  40.43 टक्के
अमरावती विभाग 43.84 टक्के
छत्रपती संभाजीनगर 11.89 टक्के
नाशिक विभाग 30.65 टक्के
पुणे विभाग 23.69 टक्के
कोकण विभाग 42.12

Advertisement