जाहिरात

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; धरणांमध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा

मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या 11 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत.

मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई; धरणांमध्ये केवळ 17 टक्के पाणीसाठा
छत्रपती संभाजीनगर:

मोसिन शेख, छत्रपती संभाजीनगर

मराठवाड्यात पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. धरणांमधील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे देखील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. यामुळे अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मराठवाड्यात सध्याच्या स्थितीत फक्त 17 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर येत आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पात 17.30 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर या 11 प्रकल्पांपैकी 3 प्रकल्प कोरडेठाक पडले आहेत. त्यामुळे मे महिन्याच्या अखेरीस मराठवाड्याला भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. 

(नक्की वाचा - जादूटोण्याच्या संशयावरुन गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जाळलं; गडचिरोलीतील धक्कादायक घटना)

चिंताजनक बाब म्हणजे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात फक्त 8 टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागणार आहे. 

(नक्की वाचा - आमदार किरण सरनाईक कुटुंबीयांच्या कारला अपघात 4 जणांचा मृत्यू)

मराठवाड्यातील पाणीसाठ्याची आकडेवारी 

  • जायकवाडी - 8 टक्के
  • येलदरी - 30 टक्के
  • सिद्धेश्वर - 2 टक्के
  • माजलगांव - 0 टक्के
  • मांजरा - 3 टक्के
  • उर्ध्व पैनगंगा - 41 टक्के
  • निम्न तेरणा - 0 टक्के
  • निम्न मनार - 27 टक्के
  • विष्णूपुरी - 30 टक्के
  • निम्न दुधना - 0 टक्के
  • सिना कोळेगांव - 0 टक्के
     

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: