लक्ष्मण सोळुंके, प्रतिनिधी
Chhatrapati Sambhaji Nagar Railway Station : जालन्यातली ठोकमळ तांडा येथे भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकात 'छत्रपती संभाजीनगर'च्या पिवळ्या बोर्डखाली दोन तरुणांनी लघुशंका केली होती. लघुशंका करणारे दोन्हीही तरुण नशेत असल्याचं उघडकीस आलं होतं. तरुणांच्या या घृणास्पद कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर तरुणांनी त्यांच्या चुकीबद्दल माफीही मागितली होती. परंतु, व्हिडीओ इन्स्टाग्रामवर तुफान व्हायरल झाल्याने त्यांना सतत धमकीचे मेसेज आणि फोन येते होते.
छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशनवर नेमकं काय घडलं?
तसच छत्रपती संभाजी नगरचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनीही हे व्हिडीओ व्हायरल केल्याची माहिती समोर आली आहे. या धमक्यांना कंटाळून महेश आडे (28) या तरुणाने विहिरीत उडी मारून स्वत:चं जीवन संपवलं. ही धक्कादायक घटना जालन्यातील ढोकमळ तांडा येथे घडली. दरम्यान, याप्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
नक्की वाचा >> सीमा, सरस्वती की रश्मी...? लोकसभेत 22 वेळा बोगस मतदान? 'ही' हिरोईन आहे तरी कोण?
तरुणाला मेसेज, कॉलवर धमक्या यायच्या, त्यानंतर..
मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यातील ढोकमळ तांडा येथे एका तरुणाने व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर फोनवर आणि मेसेजवर येणाऱ्या धमक्यांना कंटाळून आयुष्य संपवलं. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महेश आडे असं या तरुणाचं नाव असून त्याने विहिरीत उडी मारून आयुष्य संपवलं. छत्रपती संभाजी नगर रेल्वे स्टेशनवर असलेल्या छत्रपती संभाजी नगर या पिवळ्या बोर्डाजवळ त्यांने लघुशंका केली होती. त्यानंतर स्टेशनवर असलेल्या काही लोकांनी त्याचा व्हिडीओ कॅमेरात कैद केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्या तरुणाला धमक्या देण्यास सुरुवात केली. त्यानंतर या तरुणाने आत्महत्या करण्याचं टोकाचं पाऊल उचललं.
नक्की वाचा >> Women Health Issues आई होण्यापासून ते मेनोपॉजपर्यंत..शरीरात कोणकोणते बदल होतात? प्रत्येक महिलेला माहितच हवं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world