जाहिरात

'गायी, मंदिरांची सुरक्षा करणारे सरकार आम्हाला पाहिजे', काडसिद्धेश्वर महाराजांनी जाहीर केली भूमिका

गायी वाचवणारे, मंदिरांची सुरक्षा करणारे सरकार आम्हाला पाहिजे. कत्तलखाने उघडणारे आम्हाला नको', अशी स्पष्ट भूमिका कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर महाराजांनी घेतली आहे

'गायी, मंदिरांची सुरक्षा करणारे सरकार आम्हाला पाहिजे', काडसिद्धेश्वर महाराजांनी जाहीर केली भूमिका
काडसिद्धेश्वर महाराज (फोटो - @ghagte_raje)
कोल्हापूर:

विशाल पुजारी, प्रतिनिधी

गायी वाचवणारे, मंदिरांची सुरक्षा करणारे सरकार आम्हाला पाहिजे. कत्तलखाने उघडणारे आम्हाला नको', अशी स्पष्ट भूमिका कणेरी मठाचे मठाधिपती काडसिद्धेश्वर महाराजांनी घेतली आहे. देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना, राज्य सरकारनं जाहीर केली आहे. त्याच दिवशी काडसिद्धेश्वर महाराजांनी ही भूमिका जाहीर केली. 

अध्यात्मिक कार्यात बाधा न आणणारे लोकं आम्हाला हवे आहेत. मच्या मंदिरांबाबत कायदे, आमच्या मंदिरांमधला पैसा सरकारकडे जातो  मात्र चर्च आणि मस्जिद मधले कायदे नाहीत त्यांचा मात्र सरकारकडे पैसा जात नाहीआमच्या देवस्थानच्या जमिनी सगळ्या कारणांसाठी चालतात. वक्फ बोर्डाची जमीन घेऊ शकत नाही त्यामुळे आमच्या देवस्थानच्या जमिनी सुरक्षित ठेवणारे सरकार आम्हाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

एक झालं पाहिजे

जो तोडगा काढण्यास सरकारला जमते तो त्यांनी काढावा आणि जे आमच्या हातात आहे ते आम्ही करू  आताची माणसं कोणाला घाबरत असतील तर मोठ्या संख्येला घाबरतात, ती लोकं एकजूट दाखवून संख्या दाखवून भीती दाखवून कामे करून घेतात  मग आम्ही काय कमी पडतोय का? आम्ही त्यांचे बाप आहोत.. म्हणून आपण एक झालं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. 

मविआचं जागावाटप विदर्भावर अडलं, 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी!

( नक्की वाचा : मविआचं जागावाटप विदर्भावर अडलं, 2 वरिष्ठ नेत्यांमध्ये जोरदार खडाजंगी! )

राज्य सरकारचा निर्णय काय?

राज्यातील गोशाळांमधील देशी गायींच्या पालन-पोषणासाठी प्रति दिन, प्रति गाय पन्नास रुपये अनुदान योजना राबवण्याचा निर्णज आज झालेल्या (सोमवार, 30 सप्टेंबर) मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्याने आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने, त्यांना बळकट हा निर्णय घेण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून करण्यात येईल. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा गोशाळा पडताळणी समिती असेल. 

2019 मधील 20 व्या पशू गणनेनुसार देशी गायींची संख्या 46 लाख 13 हजार 632 इतकी कमी असल्याचे आढळून आले आहे. ही संख्या 19व्या पशूगणनेशी तुलना करता 20.69 टक्क्यांनी कमी झाली आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com