स्मार्टफोनचा वाढता कल आणि सुविधांच्या वाढत्या मागणीमुळे, ऑनलाइन अन्न वितरणाच्या बाजारपेठेत प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीच पंजाबमधील पटियाला येथे वाढदिवसानिमित्त ऑनलाईन मागविलेला केक खाल्ल्याने एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे ऑनलाइन अन्नपदार्थ मागवताना कोणती खबरदारी घ्यावी? चुकीचे अन्न वितरित झाल्यास तक्रार कशीआणि कुठे करावी? चला जाणून घेऊया...
ऑनलाइन जेवण मागवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?
- खराब दर्जाचे अन्न खाल्ल्याने अन्न विषबाधा किंवा ऍलर्जी होऊ शकते.
- अनोळखी हॉटेल्समधून जेवण ऑर्डर करणे टाळा
- ऑर्डर देण्यापूर्वी हॉटेलचे रेटिंग तपासा.
- हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची रेटिंग तपासा.
- विश्वसनीय हॉटेलमधूनच जेवण ऑर्डर करा
- खाण्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका
- क्रेडिट आणि डेबिट कार्डद्वारे पैसे देऊ नका
चुकीचे अन्न वितरित झाल्यास तक्रार कशी आणि कुठे करावी?
- भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या वेबसाईटवर अन्नाशी संबंधित कोणतीही तक्रार दाखल केली जाऊ शकते.
- FSSAI कडे पुरावा म्हणून संपूर्ण माहिती, फोटो किंवा व्हिडिओसह ऑनलाइन तक्रार दाखल करू शकता.
- पोर्टल व्यतिरिक्त टोल फ्री क्रमांक १८००११२१०० वर कॉल करून तक्रार दाखल करु शकता.
- हा हेल्पलाइन क्रमांक २४x७ उपलब्ध आहे.
FSSAI वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन तक्रार दाखल करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.
1 ) https://www.fssai.gov.in/ या वेबसाइटवर जाऊन नोंदणी करा.
2) यानंतर 'कम्प्लेंट' पर्यायावर क्लिक करा
3) तक्रार नोंदवण्याचा पर्याय निवडा.
4) तक्रार श्रेणी निवडा
5) हॉटेलचे नाव आणि पूर्ण पत्ता लिहा.
6) यासोबत FSSAI लायसन्स नंबर देखील लिहा.
7) तक्रारीत फोटो/व्हिडिओ, बिल, चलन अपलोड करा.
8) तुमची समस्या, तारीख, उत्पादन तपशील तपशीलवार लिहा.
9) अद्वितीय तक्रार क्रमांकाद्वारे तुम्ही तुमच्या तक्रारीचा मागोवा घेऊ शकता.