Importance of Dharma Dhwaja : नाशिकमधील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. या कार्यक्रमावेळी मोठ्या संख्येने भाविक आणि मान्यवर उपस्थित होते. १९६२ साली काळाराम मंदिरात धर्मध्वज उभारण्यात आला होता. त्यानंतर आता २१ फुटी उंचीचा पितळ्याचा स्तंभ उभारण्यात आला आहे. हा धर्मध्वज केशरी रंगाचा असून त्याचा परिमाण साधारण पाच फूट बाय ११ फूट असेल. या ध्वजावर भगवान हनुमानाची प्रतिमा तसेच जय श्रीराम, ओमचं चिन्ह अंकित केलेलं आहे.
काळाराम मंदिराचा धर्मध्वज का बदलला?
आज ६ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, श्री काळाराम देवस्थानाचा प्राचीन धर्मध्वज जीर्ण झाला होता. १९६२ साली येथे धर्मध्वज उभारण्यात आला होता. मात्र वातावरणातील बदलामुळे तो जीर्ण झाला होता. त्यामुळे तो बदलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज का फडकवला जातो?
मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवण्याची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. मंदिराचं शिखर एक सर्वोच्च बिंदू आहे, जेथे ब्रम्हांडाची ऊर्जा सर्वात आधी मंदिरात प्रवेश करते. हा ध्वज ब्रम्हांडातील ऊर्जा आणि गर्भगृहात विराजमान ईश्वराची ऊर्जा यामध्ये एक संपर्क सूत्राप्रमाणे कार्य करतं. फडकणाऱ्या ध्वजामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्ज संचार करते आणि जवळपासचा भाग पवित्र करते.
मंदिराच्या शिखरावर धर्मध्वज फडकवणं एक अत्यंत जुनी परंपरा आहे आणि हिंदू धर्मात याचा अत्यंत खोल धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व आहे. याच्याशी धार्मिक, ऐतिहासिक महत्त्व जोडले गेले आहे. हा ध्वज दिव्यता, संरक्षण आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं.
मंदिर ओळखण्याचे संकेत...
युद्धाच्या आणि प्रवासाच्या काळात ध्वज दिशादर्शक किंवा मार्गदर्शक म्हणून वापरला जात असे. प्राचीन काळी, जेव्हा मंदिरे मोठी आणि सहज दिसणारी वास्तू नव्हती, तेव्हा ध्वज स्वतःच एक ओळखचिन्ह म्हणून काम करत असे. ध्वज पाहून लोकांना दुरूनच कळायचं की तिथे देवस्थान आहे.
(वरील लेख सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world