जाहिरात

'लाडकी बहीण' योजनेचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

'लाडकी बहीण' योजनेचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर:

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana : राज्यभरातील महिलांमध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची चर्चा आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला हफ्ता 3 हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पाचोड शिवाजीनगर भागात राहणाऱ्या पार्वती जनार्दन बनसोडे (वय 35) यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता. त्यांचे छत्रपती संभाजीनगर येथील बँक ऑफ बडोदा येथे तीन हजार रुपये जमा झाले होते. हे पैसे त्या त्यांचा मुलगा निखीलसोबत जामखेड शिवारात आल्या होत्या. त्यावेळी पार्वती यांना चक्कर आली आणि त्या मोटारसायकवरुन खाली डोक्यावर पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. 

( नक्की वाचा : Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )

त्यांना तातडीनं पाचोड ग्रामीण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. घाटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केलं. या घटनेमुळे पाचोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पार्वती बनसोडे यांच्या पश्चात पती आणि दोन मुलं असा परिवार आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
Beed Tembhe Ganpati : गणेश चतुर्थीनंतर सात दिवसांनी का होते टेंबे गणपतीची स्थापना? वाचा इतिहास
'लाडकी बहीण' योजनेचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
gadchiroli Etapalli elderly couple murder witchcraft Black magic
Next Article
पती पत्नी अन् जादूटोणा? नदीच्या संगमाजवळ दोघांचे मृतदेह, हैराण करणार हत्याकांड