जाहिरात

Beed News : महिलेला सरपंचासह 10 जणांकडून बेदम मारहाण, अंग काळे-निळे पडले; Photo आले समोर

Beed Crime News : हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपींविरोधात झाला पाहिजे. आरोपीचं सरपंच पद काढून घेतलं पाहिजे. आम्हाला संरक्षण देण्यात यावं ही शासनाकडे विनंती आहे, असं ज्ञानेश्वरी अंजान यांनी म्हटलं.   

Beed News : महिलेला सरपंचासह 10 जणांकडून बेदम मारहाण, अंग काळे-निळे पडले; Photo आले समोर

Beed News : अमानुष मारहाणीच्या घटनेमुळे बीडमधील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिला वकिलाला सरपंच व इतर दहा जणांनी बेदम मारहाण केली आहे. 14 एप्रिल रोजी लाकडी काठी व रबरी पाईपने महिलेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. 

घराजवळ होत असलेल्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारीनंतर महिलेला बेदम मारहाण झाल्याची माहिती आहे.  महिलेला अमानुषपणे मारहाण केल्यानंतर याचे फोटो समोल आले आहेत. महिलेच्या अंगावर मारहाणी व्रण दिसतं आहे. यामुळे सर्वंत्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी पुढे येत असून वडगाव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पीडित महिला ज्ञानेश्वरी अंजान यांनी याबाबत म्हटलं की, मंदिरांवरील भोंगे आणि गिरण्यांची विविध अधिकाऱ्यांकडे मी तक्रारी दिल्या आहेत. त्यातून मला ही मारहाण झाली आहे. 9-10 जणांना मिळून मला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली आहे. मला शिविगाळ करण्यात आली. मला मारहाण झाली तिथे सोडवण्यासाठी कुणीही नव्हतं. ठरवून त्यांनी मला मारहाण केली. 

पोलिसांनी मला खूप सहकार्य केले. पोलिसांना मला वेळीच मदत केली म्हणून मी आज तुमच्यासमोर आहे. आरोपींविरोधात मकोका लावून कारवाई करावी. त्यांना जामीन मिळू नये. हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा आरोपींविरोधात झाला पाहिजे. आरोपीचं सरपंच पद काढून घेतलं पाहिजे. आम्हाला संरक्षण देण्यात यावं ही शासनाकडे विनंती आहे, असं ज्ञानेश्वरी अंजान यांनी म्हटलं.   

(नक्की वाचा- नाशिक हिंसाचार प्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर, MIM च्या शहराध्यक्षासह 38 जणांना अटक)

जितेंद्र आव्हाडांचं ट्वीट

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्ट करत या घटनेकडे सर्वांच लक्ष वेधलं. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटलं की, "अंबाजोगाई सत्र न्यायालयात वकिली करणाऱ्या महिलेला सरपंच आणि त्याच्या कार्यकर्त्याकडून शेतात रिंगण करून काठ्या आणि जेसीबी पाईपने जबर मारहाण झाली. महिलेने गावातील ध्वनिप्रदूषणामुळे मायग्रेनचा त्रास होत असल्याने आवाज कमी करावा. लाऊडस्पीकर लावू नयेत, घरापुढील पीठाच्या गिरण्या काढाव्यात, याबाबत कार्यालयीन तक्रारी दिल्या होत्या. महिला बेशुद्ध पडल्यानंतर दवाखान्यातूनही एका रात्रीत उपचार करून घरी पाठवलं आहे. सरपंच आणि इतर दहा पुरूषांनी मिळून एका वकील असलेल्या स्त्रीला मारहाण करणं कितपत योग्य? गावात सरपंचाचा कारभार कसा असेल कोणत्या पक्षाचा हा सरपंच आहे?" 

(नक्की वाचा-  Traffic Jam : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा)

आरोपींविरोधात कारवाई केली जाणार

बीडमध्ये ज्या महिलेला अमानुष  मारहाण करण्यात आली, तिचे फोटो मला काल रात्री प्राप्त झाले आहेत. जे दोषी असतील त्यांच्यावर योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: