समाधान कांबळे, हिंगोली
हिंगोलीमधील कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केलेल्या महिलांना थंडीच्या दिवसांमध्ये जमिनीवर झोपवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात 43 महिलांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली. ग्रामीण रुग्णालयात कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णालय प्रशासनाने या महिलांना चक्क जमिनीवर झोपवलं. या महिलांना बेड उपलब्ध नसल्याने नाईलाजाने शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना जमिनीवर झोपण्याची वेळ आली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे रुग्णालय प्रशासनाची रुग्णांबाबतची अनास्था दिसून येत आहे.
(नक्की वाचा- राज्य मंत्रिमंडळ विस्तार : भाजपाचा सल्ला शिंदेंनी मानला ! 'त्या' 4 जणांना वगळणार, पाहा संभाव्य यादी)
काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी यावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. आरोग्य विभागाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बोगस औषध, बोगस खरेदी, भ्रष्टाचार सुरू आहे. चोरांचा सुळसुळाट झाला आहे. तुम्ही कितीही पैसे खा, मात्र लोकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करा.
( नक्की वाचा : EVM तर फक्त बहाणा, काँग्रेसला निवडणूक निकालापूर्वीच लागली होती पराभवाची चाहूल, सत्य उघड )
जर शस्त्रक्रिया झालेल्या महिलांना खाली झोपण्याची वेळ येत असेल तर महाराष्ट्रात सरकार आहे का? असा प्रश्न निर्माण होतो. सत्ता सरकार येऊन एवढे दिवस झाले, तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्री पदांची चर्चा सुरू आहे. तुम्ही आपापसात बसून चर्चा करत नाही, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय देत नाही. त्यामुळे अधिवेशनात आम्ही या मुद्द्यांवर भर देऊ, असा इशाराही विजय वडेट्टीवार यांनी दिला.