जाहिरात

Womens Day 2026: डोंबिवलीत नारीशक्तीचा अनोखा उत्सव! थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी आणि पारंपरिक कलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते.

Womens Day 2026: डोंबिवलीत नारीशक्तीचा अनोखा उत्सव! थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली नोंद

Womens Day 2026: नारीशक्तीच्या गौरवाचा, कौतुकाचा दिन म्हणून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. आज जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात, जल्लोषात साजरा केला जात आहे. राज्यात महिला दिनानिमित्त वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच महिला दिनाचं निमित्त साधून डोंबिवलीतविद्यार्थिनींच्या लेझीम-योगचाप व्यायामाचा जागतिक विक्रम प्रस्थापित करण्यात आला.

९१११ विद्यार्थिनींचे लेझीम प्रात्यक्षिक!

याबाबत सविस्तर वृत्त असं की, जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने डोंबिवली शहरात नारीशक्तीचा अनोखा उत्सव साजरा करण्यात आला. शहरातील सुमारे ९१११ विद्यार्थिनींनी एकत्र येत लेझीम-योगचाप व्यायामाचे भव्य प्रात्यक्षिक सादर करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. हा कार्यक्रम डोंबिवलीतील सावळाराम क्रीडा संकुल येथे पार पडला.

डोंबिवली हे सांस्कृतिक परंपरेसाठी ओळखले जाणारे शहर असून येथील विविध सामाजिक संस्था, शाळा व महाविद्यालये हिंदू संस्कृती जपण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना रुजविण्यासाठी आणि पारंपरिक कलेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते.

PMPML Free Bus Ride: पुण्यातील लाडक्या बहि‍णींना गिफ्ट! PMP बसने दिवसभर मोफत फिरा; 'या' 31 मार्गांवर खास सेवा

डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार तसेच कल्याण तालुका शारीरिक शिक्षण विभाग यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यापूर्वीही शहरात १० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी एकत्र येत जनगणमन हे राष्ट्रगीत गायले होते आणि त्यावेळीही विक्रम प्रस्थापित झाला होता.
लेझीम हा महाराष्ट्राच्या पारंपरिक कलेचा महत्त्वाचा भाग मानला जातो.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

पुढील पिढीपर्यंत हा सांस्कृतिक ठेवा पोहोचावा, या उद्देशाने गेल्या काही दिवसांपासून शाळांमधील शिक्षकांनी विद्यार्थिनींना विशेष प्रशिक्षण दिले होते. त्याच प्रशिक्षणाचा परिपाक म्हणून महिला दिनाच्या औचित्याने हजारो विद्यार्थिनींनी एकत्र येत लेझीम-योगचाप व्यायाम सादर केला. या भव्य उपक्रमामुळे १८० देशांमध्ये मान्यता असलेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये या विक्रमाची नोंद झाली.

 दरम्यान, यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख प्रेरणास्थान असलेले भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सहभागी सर्व विद्यार्थिनींचे अभिनंदन करत नारीशक्तीचा गौरव केला.

Womens Day 2026: मॅनेजर ते शिपाई.. महिलांच्या हातात लालपरीचा कारभार, रेकॉर्डब्रेक कमाई करुन दाखवली

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com