जाहिरात

रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा; शिवकालीन खगोलशास्त्रावर पडणार प्रकाश

संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर पोस्ट करून रायगडावर उत्खनन सुरु असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती दिली आहे.

रायगडावर सापडला ऐतिहासिक ठेवा; शिवकालीन खगोलशास्त्रावर पडणार प्रकाश

विशाल पुजारी, कोल्हापूर

रायगड किल्ल्यावर भारतीय पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने संशोधनाची कामे सुरू आहेत. या कामांतर्गत रायगडावरील प्राचीन ‘यंत्रराज सौम्ययंत्र' (Astronomical Instrument) या वस्तूचा शोध लागला आहे. शिवकालीन इतिहासातील अद्भुत शोध मानल्या जाणाऱ्या या यंत्राच्या अभ्यासातून त्या काळातील खगोलशास्त्रीय परंपरा आणि तंत्रज्ञान यावर महत्त्वाचा प्रकाश पडणार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संभाजीराजे छत्रपती यांनी फेसबुकवर पोस्ट करून रायगडावर उत्खनन सुरु असताना ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा पुरावा सापडल्याची माहिती दिली आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्याकडून सुरु असलेल्या उत्खनन कार्यात 'यंत्रराज' हे उपकरण सापडल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. 

(नक्की वाचा-   रुपाली चाकणकरांना महिला आयोग अध्यक्षपद सोडावं लागणार? काय आहे कारण?)

Yantraraj Soumyayantra

Yantraraj Soumyayantra

संभाजीराजे छत्रपती यांनी या शोधाबाबत फेसबुक पोस्टद्वारे माहिती देताना सांगितले की, "गेल्या तीन ते चार वर्षांपासून रायगडावर उत्खननाचे कार्य सुरू आहे. या उत्खननात रोपवे अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस, कुशावर्त तलावापासून ते बाजारपेठ आणि जगदीश्वर मंदिरापर्यंतच्या भागात शिवकालीन वाड्यांचे अवशेष सापडले आहेत. या अवशेषांमधून स्वराज्याच्या प्रशासकीय आणि सांस्कृतिक वैभवाची झलक मिळते. याच उत्खननादरम्यान सौम्ययंत्राचा शोध लागला, ज्यामुळे रायगडाच्या बांधकामातील खगोलशास्त्रीय दृष्टिकोनाचा पुरावा मिळाला."

(नक्की वाचा-  British Youtuber : दुबईत चोरी झालेले AirPods पाकिस्तानात, ब्रिटिश यूट्यूबरच्या पोस्ट जगभरात चर्चेत)

'यंत्रराज'चा वापर कशासाठी व्हायचा? 

प्राचीन काळात खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी, दिशा जाणून घेण्यासाठी व नक्षत्र-ग्रह गणनेसाठी या प्रकारच्या यंत्रांचा वापर केला जात असे. वेद, ज्योतिष, स्वारस्य, खगोल, वेध, त्रिकोणमिती यांसारख्या गोष्टींचा अभ्यास या यंत्रांद्वारे सोपा होत असे. सूर्योदय, सूर्यास्त यांची नोंद घेणे, वसाहतींच्या खगोलशास्त्रीय गणनांसाठी या यंत्रांचा वापर झाला असण्याची शक्यता अभ्यासक व्यक्त करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com