जाहिरात

बारावी पास युवा शेतकऱ्याने कमाल केली, कोरडवाहू जमिनीत ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली

इथल्या एका युवा आदिवासी तरूण शेतकऱ्याने डेअरिंग केली अन् शेतीत कमाल करून दाखवली. आता त्याने जे पिक घेतलं आहे त्यातून तो लाखोत खेळेल हे मात्र नक्की आहे.

बारावी पास युवा शेतकऱ्याने कमाल केली, कोरडवाहू जमिनीत ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली

प्रशांत जव्हेरी        

नंदूरबारच्या सातपुड्यात कोरडवाहू आणि खडकाळ जमीन आहे. पाण्याची तर नेहमीच कमतरता या भागात असते. त्यामुळे शेती करण्याकडे इथल्या शेतकऱ्यांता कल नसतो. जरी शेती केली तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या भागातले तरूण शेती ऐवजी शहराकडे रोजगारासाठी जातात. मात्र इथल्या एका युवा आदिवासी तरूण शेतकऱ्याने डेअरिंग केली अन् शेतीत कमाल करून दाखवली. आता त्याने जे पिक घेतलं आहे त्यातून तो लाखोत खेळेल हे मात्र नक्की आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

दिलीप पाडवी असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. अक्कलकुवा तालुक्यातील डाब वालंबा या गावात तो राहतो. त्याची स्वत:ची शेती आहे. पण तो केवळ पारंपरिक शेतीवरच अवलंबून न राहता शेतीतले इतर पर्याय शोधत होता. शेवटी त्याला तोपर्याय सापडला. त्याने आपल्या शेतात ड्रॅगन फ्रुटची लागवड करण्याची डेअरिंग केली. कोरडवाहू क्षेत्रात त्याने घेतलेला हा निर्णय खरोखच धाडसाचा होता. 

ट्रेंडिंग बातमी - 'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

काळाच्या ओघात शेतीचे स्वरुप बदलत असले. त्यात शेतीमध्ये काय राम आहे? असे म्हणणारे अनेक जण भेटतात. पण त्याला युवा शेतकरी दिलीप पाडवी अपवाद आहे. ज्या अक्ककुवा तालुक्यात फक्त पावसाळी पिके घेतली जात होती, त्या भागात त्याने  बारामाही ड्रॅगन फ्रुटचे उत्पादन घेतले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - वजन कमी करण्यासाठी काय कराल? 'या' फळाचं करा सेवन 

कृषी विभागाच्या माध्यमातून दिलीप पाडवी याला 60 रुपये दराने ड्रॅगन फ्रुटची रोप उपलब्ध करून देण्यात आली होती. आपल्या छोट्याशा शेतात त्याने 500 रोपांची लागवड केली. त्याला आता वर्ष पुर्ण होत आहे. योग्य नियोजना सोबतच ठिंबक सिंचनचा वापर करत त्याने ही रोपं जगवली. त्यासाठी त्याने कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत आणि कीटकनाशक वापरले नाहीत. आता या रोपांना ड्रॅगन फ्रुट लगडले आहेत. त्यांना मागणीही चांगली आहे. बाजारात सध्या त्याचा भाव दोनशे रूपये किलो आहे. त्यामुळे दिलीप पाडवी याचा आता फायदाच फायदा आहे. तो आता लाखोत खेळेल. त्याने केलेल्या डेअरिंगला यशाचं फळ मिळालं आहे. त्याने केलेल्या या शेतीचं परिसरात कौतूक होताना दिसत आहे. शिवाय आता या भागातले युवा शेतकरी अशाच पद्धतीची शेती करण्याकडे झुकले आहेत.  
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
जरांगेना आरक्षणाचा प्रश्न मिटवायचा नाही, मुख्यमंत्री होण्याची इच्छा ! मराठा आमदाराचा हल्लाबोल
बारावी पास युवा शेतकऱ्याने कमाल केली, कोरडवाहू जमिनीत ड्रॅगन फ्रुटची शेती फुलवली
Sharad Pawar give the big reason why central government gave Z plus security
Next Article
केंद्र सरकारने सुरक्षा का पुरवली? शरद पवारांनी दिली मोठी माहिती