नागिंद मोरे, धुळे
Dhule Crime News : पेट्रोल उधार दिलं नाही म्हणून पंपावर काम करणाऱ्या तरुणाना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. धुळे तालुक्यातील न्याहळोद येथी इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर ही घटना घडली आहे. येथे काम करणाऱ्या चंद्रमणी जाधव या तरुणास मारहाण करण्यात आली. सर्व आरोपींवर मोक्कातंर्गत कारवाई करावी, अशी मागणी समस्त आंबेडकरी युवक धुळे शहरतर्फे करण्यात आली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची भेट घेऊन ही मागणी यावेळी करण्यात आली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बिलाडी येथील चंद्रमणी महेंद्र जाधव हा तरुण न्याहळोद येथील एक पेट्रोल पंपावर कामावर असताना सनी कोळी याने उधारीवर पेट्रोल आपल्या गाडीत टाकून देण्याचा हट्ट धरला. चंद्रमणीने याला नकार दिल्यावर तो व त्याचा साथीदार किरण पाटील यांनी केबिनमध्ये घुसून चंद्रमणीला जाधव याला जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली.
( नक्की वाचा- Political News : सांगलीत ठाकरे गटाला धक्का, चंद्रहार पाटील शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर?)
घटनेची माहिती मिळताच चंद्रमणीचे मामा गौतम अहिरे व त्याचा मुलगा प्रदीप अहिरे हे दोघे त्या ठिकाणी पोहोचलो. त्यावेळी संतापलेल्या सनी कोळी याने ह्या दोघांवर चाकूने हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या मारहाणीत दोघांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी हिरे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
(नक्की वाचा : केमिस्ट्रीच्या शिक्षिकेवर नवऱ्याच्या हत्येचा आरोप, कोर्टात असा केला युक्तिवाद की न्यायाधीशही थक्क! पाहा Video )
याप्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही दोन्ही आरोपी अद्याप मोकाट आहेत. फरार असलेले दोघे आरोपी रात्री वाळुची तस्करी करतात. त्यामुळे सनी कोळी व त्याचा सहकारी किरण पाटील यांचे अवैध धंदे बंद करावे. तसेच त्यांच्याकडील गावठी कट्ट्याबाबत चौकशी करून दोघांवर महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत तत्काळ कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.