
योगेश शिरसाट, अकोला
अकोला जिल्ह्यातील अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शंकरनगर येथे राहणाऱ्या संघपाल खंडारे यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्येसारखं टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सात वर्षांपूर्वी संघपाल यांचा शबनम फातिमा हिच्याशी आंतरधर्मीय विवाह झाला होता. त्यांना एक सहा वर्षांची मुलगी आहे. मात्र, गेल्या काही काळापासून दोघांमध्ये वाद सुरू होते.
'दादा... हा व्हिडिओ पोलिसांना दाखव', आत्महत्येपूर्वी संघपालने पाठवला मोठ्या भावाला व्हिडिओ...
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस गावचा रहिवासी संघपाल खंडारे यांने सोमवारी रात्री पती-पत्नीच्या दोघांमध्ये झालेल्या भांडणानंतर शबनमच्या चुलत भावासह नातेवाईकांनी जबर पायल इलेक्ट्रॉनिक्सजवळ संघपालला मारहाण केल्याचा आरोप त्याने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी केला आहे. याचे काही व्हिडिओ फुटेज सीसीटीव्ही कॅमेरा दिसणार आहेत असं त्याने म्हटलं आहे. यादरम्यान, काही दिवसांपूर्वी शबनमच्या आग्रहावरून संघपालने तीन लाखांचे कर्ज घेतले होते.
नक्की वाचा - Amravati News: महिला पोलिसाच्या हत्येचं गुढ उकललं; नवऱ्यानेच केली हत्या, संतापजनक कारण समोर
संघपालची पत्नी शबनमच्या नातेवाईकांनी मारहाण करून आणि जीवे मारण्याच्या धमकीमुळे मानसिक तणावात असलेल्या संघपालने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या मोठ्या भावाला पाठवला. त्यात पत्नी शबनम फातिमा, तिचा भाऊ आणि आई आणि इतर नातेवाईक जबाबदार असल्याचे त्याने या व्हिडिओद्वारे स्पष्ट आरोप केलाचं दिसून येत आहे. ते मला मारून टाकतील, त्याआधीच मी स्वत:चा जीव घेतो असं तिने या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान सोमवारी संघपालला मारहाण केल्यानंतर त्याचा मृतदेह बाळापूरच्या पारस गावाजवळ अकोला अमरावती लोहमार्गावर पडून दिसून आला. याबाबत अकोल्याच्या लोहमार्ग पोलिसांनी आता या घटनेबाबत पुढील तपास सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून सुरू केला आहे
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world