महाराष्ट्राच्या राजकारणाला घराणेशाहीचा विळखा; 288 पैकी 237 आमदार घराणेशाहीचे...

2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील 38 उमेदवार घराणेशाहीचे होते.  

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत मविआला सपाटून पराभवाचा सामना करावा लागला आणि महायुतीने 230 जागांसह अभूतपूर्व असं यश संपादन केलं आहे.

घराणेशाही या मुद्द्यावरुन अनेकदा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतात. मात्र प्रत्यक्षात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूने घराणेशाही वाढत असल्याचं चित्र आहे. यंदाच्या निवडणुकीत २८८  आमदारांपैकी तब्बल 237 आमदार घराणेशाहीतून समोर आल्याचं दिसून येत आहे. राजकीय अभ्यास हेरंब कुलकर्णी यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा अभ्यास केला. त्यांनी केलेल्या अभ्यासानुसार, नवनिर्वाचित 288 आमदारांपैकी 237 आमदार घराणेशाहीतून आले आहेत. 

नक्की वाचा - राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू

237 पैकी कोणत्या पक्षाचे किती आमदार?

भाजप - 149/49
शिंदे गट - 81/19
अजित पवार गट - 59/26 
एकूण - 94

काँग्रेस - 101/42
शरद पवार गट - 86/39
ठाकरे गट - 95/19
एकूण - 100
 
इतर - 43 

- घराणेशाहीच्या 237 उमेदवारांपैकी 89 उमेदवार विजयी झाले तर 151 उमेदवार पराभूत झाले. (मात्र घराणेशाहीचे उमेदवार कमी संख्येने निवडून आले यामागील कारण हे घराणेशाहीला नाकारले असं होत नाही कारण या निवडणूक निकालाची कारणं वेगळी आहेत.)

विभागवार पाहायचं झालं तर सर्वाधिक घराणेशाहीचे उमेदवार कोणत्या विभागातून आले...

पश्चिम महाराष्ट्र - 77
मराठवाडा - 39
खानदेश - 38
विदर्भ - 49
मुंबई कोकण - 39
एकूण - 237

नक्की वाचा - अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं


घराणेशाहीच्या उमेदवारांची काही उदाहरणं...

वडील आणि मुलगा..
हितेंद्र ठाकूर (वसई) - क्षितीज ठाकूर (नालासोपारा)
गणेश नाईक (ऐरोली) - संदीप नाईक (बेलापूर)

वडील आणि मुलगी
नबाव मलिक - सना मलिक (अणुशक्तीनगर)
धर्मराबाबा अत्राम (अहेरी) - भाग्यश्री अत्राम (अहेरी)
विजयकुमार गावित (नंदुरबार ) - हिना गावित (अक्कलकुवा)

काका आणि पुतण्या...
छगन भुजबळ (येवला) - समीर भुजबळ (नांदगाव)
अजित पवार (बारामती) - युगेंद्र पवार (बारामती)
संजय शिंदे (करमाळा) - रणजितसिंग शिंदे (माढा)
तानाजी सावंत (परांडा) - अनिल सावंत (पंढरपूर)
तुषार राठोड (मुखेड) - संतोष राठोड (मुखेड)
राजेंद्र शिंगणे (सिंदखेडराजा) - गायत्री शिंगणे (सिंदखेडराजा)

Advertisement

भाऊ - भाऊ
आशिष शेलार - विनोद शेलार (मालाड पश्चिम)
आदित्य ठाकरे (वरळी) - अमित ठाकरे (माहीम) - वरुण सरदेसाई (वांद्रे पूर्व)
किरण सामंत (राजापूर) - उदय सामंत (रत्नागिरी)
निलेश राणे (कुडाळ) - नितेश राणे (कणकवली)
रोहीत पवार (कर्जत जामखेड) - युगेंद्र पवार (बारामती)
विजयराव गावित (नंदुरबार) - राजेंद्र गावित (शहादा) - शरद गावित (नवापूर)
विश्वजित कदम (पलूस कडेगाव) - विक्रमसिंग सावंत (जत)
संदीप क्षीरसागर (बीड) - योगेश क्षीरसागर (बीड)
धीरज देशमुख (लातूर ग्रामीण) - अमित देशमुख (लातूर शहर)
इंद्रनील नाईल (पुसद) - ययाती नाईक (कारंजा)
आशिष देशमुख (सावनेर) - अमोल देशमुख (सावनेर)

भाऊ - बहीण
वैशाली सूर्यवंशी (पाचोरा) - किशोर पाटील (पाचोरा)
भाग्यश्री आत्राम (अहेरी) - अम्ब्रीशराव अत्राम (अहेरी)

पती - पत्नी
हर्षवर्धन जाधव (कन्नड) - संजना जाधव (कन्नड)

- एकूण 61 मतदारसंघात एकापेक्षा जास्त घराणेशाही उमेदवार होते. 50 मतदारसंघात 2 घराणेशाही उमेदवार आहेत. तर 10 मतदारसंघात 3  घराणेशाही उमेदवार आहेत. तर एका मतदारसंघात 4 घराणेशाही उमेदवार आहेत. त्यामुळे 61 मतदारसंघ दोन घराण्यात वाटले गेले आहेत. 

- कोणत्या पक्षाने जास्त घराणेशाहीचे उमेदवार दिले हे पाहिलं तर शरद पवार गट आणि अजित पवार गटातील उमेदवारांची संख्या जास्त आहे. याचा अर्थ फूट झाली असली तरी दोन्ही पक्ष जिल्हाजिल्ह्यातील घराणेशाहीच्या सरंजामदार नेत्यांनीच बनलेले होते आणि आहेत. 

- दोन्ही शिवसेनेने दिलेले घराणेशाही उमेदवार केवळ 19 टक्के आहेत. सत्तेच्या काळात अनेक घराणी सेनेत आली, तरीही पक्षात अजूनही सामान्य कुटुंबातून आलेली संख्या मोठी आहे. पक्षप्रमुख कुटुंबात दोन्हीकडेही घराणेशाही आहेत. 

- भंडारा जिल्ह्यात एकही उमेदवार घराणेशाहीचा नाही.

- मुंबईत घराणेशाहीचे उमेदवार कमी आहेत. येथे ती जागा नवश्रीमंत यांनी घेतली आहे. 

- 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील 38 उमेदवार घराणेशाहीचे होते.