जाहिरात

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू

विधानसभेतील मविआच्या अपयशामागे हे कारण महत्त्वाचं ठरलं असं अनेकांचं मत आहे. 

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू
मुंबई:

प्रादेशिक पक्षांचा विचार करता महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल परस्पर विरोधी लागला. या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्षांचा अक्षरश: सुपडा साफ झालाय. दुसरीकडे झारखंडमधील प्रादेशिक पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाने भाजपसारख्या बड्या पक्षाला आव्हान देत जबरदस्त  विजय मिळवला. मात्र महाराष्ट्रात हे शक्य झालं नाही. यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जातं. त्यातील एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांमधील फाटाफूट आणि एकतेचा अभाव. विधानसभेतील मविआच्या अपयशामागे हे कारण महत्त्वाचं ठरलं असं अनेकांचं मत आहे. 

ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?

नक्की वाचा - ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?

मराठी बाणा आणि हिंदुत्वाच्या मुद्दावरुन उभ्या राहिलेल्या शिवसेनेची सुरुवातीला दोन आणि आता तीन शकलं झाली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावरही झाल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. याच पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी महाराष्ट्रासाठी एकत्र येण्याची मागणी जोर धरत आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील एका मोठ्या नेत्याने ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी यासंदर्भात उद्धव ठाकरेंशी बातचीत सुरू केली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं यासाठी हा बडा नेता प्रयत्न करीत आहे. गरज लागली तर यापुढेही उद्धव ठाकरेंशी बोलून दोघे एकत्र येण्यासाठी प्रयत्न करेल अशी भूमिका या मोठ्या नेत्याने व्यक्त केली आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं

नक्की वाचा ​​​​​​​- अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं

मनसेमुळे मतांचं विभाजन...
विधानसभा निवडणुकीत मनसेचे 125 उमेदवार रिंगणात उतरले होते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे यांनी माहीम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र राज ठाकरेंना पूत्रालाही जिंकून आणता आलं नाही.  मनसेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी 95 जागांवर उमेदवार दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्यातील 20 उमेदवार निवडून आले. मनसेच्या उमेदवाराने अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचं मतं विभाजन झाल्याचं दिसून येत आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com