सांगलीनंतर 'या' मतदारसंघातही मविआमध्ये बंडखोरी; आता ठाकरे काय करणार?

सांगलीनंतर आता आणखी एका मतदारसंघात मविआमध्ये बंडखोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
अहमदनगर:

शिवसेना ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर सांगली लोकसभा मतदारसंघात विशाल पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे सांगली मतदारसंघात मविआचे चंद्रहार पाटील, महायुतीचे संजयकाका पाटील आणि विशाल पाटील अपक्ष निवडणूक लढवणार असल्यानं मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. सांगलीनंतर आता आणखी एका मतदारसंघात मविआमध्ये बंडखोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. 

अहमदनगरमधून निलेश लंके यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. निलेश लंके मतदारसंघात जोरदार प्रचारही करीत आहे. असं असताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अहमदनगर उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी महाविकास आघाडीकडून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये निलेश लंके यांना उमेदवारी दिली असतांना देखील अर्ज भरल्याने महाविकास आघाडीतील नाराजी चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. मात्र मी निलेश लंके यांच्यासोबतच असून 26 एप्रिल रोजी सर्व माहिती देणार असल्याची प्रतिक्रिया गिरीश जाधव यांनी दिली आहे. काहीही झालं तरी ते निवडणूक लढविण्यावर ठाम असल्याचं गिरीश जाधव यांचं म्हणणं आहे. 

Advertisement

नक्की वाचा : उमेदवारांचा अर्ज रद्द होण्याची कारणं काय? सूरतमधील प्रकरणात नेमकं काय घडलं?
    
गिरीश जाधव म्हणाले...

मी भरलेला अर्ज हा निलेश लंकेंच्या विरोधात नव्हे तर सुजय विखे यांच्या विरोधात भरला आहे. आम्ही आजही निलेश लंके यांच्या सोबतच आहोत. मात्र माजी मंत्री अनिल राठोड यांच्याशी विखे यांनी केलेली गद्दारी केली. त्यामुळे 26 एप्रिल रोजी मोठा गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अहमदनगर उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव यांनी दिली आहे.
 

Advertisement