विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सपाटून मारा खाल्ला. त्यांचा एकही उमेदवार निवडून येवू शकला नाही. तर अनेक उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचवता आली नाही. निकालानंतर राज ठाकरे यांनी अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच... अशी मोजक्या शब्दात प्रतिक्रीया दिली होती. त्यानंतर त्यांनी फारसे राजकीय वक्तव्य केली नाहीत. निवडणूक निकालाच्या दोन महिन्यानंतर आता राज ठाकरे बोलणार आहेत. ते ही मनसैनिकांच्या मेळाव्यात. त्याची तारीख आणि वेळ दोन्ही ठरले आहे. त्यामुळे या मेळाव्यात राज ठाकरे कोणतं 'राज' उलगडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यातून त्यांनी 288 पैकी 135 जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. राज ठाकरे प्रचारा दरम्यान सत्ता आपल्या हातात द्या असं आवाहन करत होते. शिवाय मनसे हा सत्तेतला पक्ष बनेल असं ही राज म्हणाले होते. पण निवडणूक निकालानंतर यापैकी काहीच झालं नाही. सत्ता तर सोडाच मनसेचा एकही उमेदवार विजयी होवू शकला नाही. राज यांचा मुलगा अमित ही निवडणुकीत पराभूत झाले. ते थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. सत्तेत सहभागी होण्याची संधी होती पण त्यासाठी एकही आमदार राज ठाकरे यांचा निवडून आला नाही.
ट्रेंडिंग बातमी - Sad news: 2 सिक्स मारले अन् कोसळला, क्रिकेटच्या ग्राऊंडवर भयंकर घडलं
या पराभवानंतर राज ठाकरे फार व्यक्त झाले नाहीत. त्यांनी अविश्वसनीय ! तूर्तास एवढेच... असं अवघ्या तिन शब्दात आपली प्रतिक्रीया दिली होती. त्यानंतर राजकीय कार्यक्रमात राज ठाकरे दिसले नाहीत. शिवाय त्यांनी कुठले राजकीय वक्तव्यही त्यानंतर केले नाही. काही वेळासाठी ते राजकारणापासून दुर गेले आहेत की काय असं वाटत होतं. त्याच वेळी त्यांनी नाशिकचा दौरा आयोजित केला होता. पण तो ही ते अर्धवट सोडून मुंबईला परतले होते. त्यावेळीही वेगवेगळ्या राजकीय चर्चा झाल्या होत्या. एकीकडे नवे सरकार स्थापन झाले आहे. त्यात अनेक प्रश्नांनी सत्ताधारी घेरले गेले आहेत. अशा वेळी मनसेच्या तंबूत मात्र शांतता दिसत आहे.
अशा वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक कधीही जाहीर होवू शकतात. त्यासाठी सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अशा वेळी मनसेची भूमीका गुलदस्त्यात आहे.शिवाय राज ठाकरे काय भूमीका घेणार? विधानसभेतील पराभव कशा मुळे झाला? पुढची रणनिती काय? हे आणि या सारखे अनेक प्रश्न मनसैनिकांना पडले आहेत. विरोधकांनी पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. शिवाय त्या विरोधात आंदोलनंही केली आहेत. अशा वेळी खरोखर इव्हीएममध्ये गडबड झाली का? याची चर्चा राज्यात झाली.
ट्रेंडिंग बातमी - Buldana news: आईच्या पोटात बाळ अन् त्या बाळाच्या पोटात ही बाळ, असं का घडतं?
महायुतीला विजय मिळाला असला तरी या विजयाबाबत शंका निर्माण करण्यात विरोधक काही अंशी यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. त्यात आता दोन महिन्यानंतर राज ठाकरेंनी मनसैनिकांबरोबर संवाद साधण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या तमाम पदाधिकाऱ्यांना सस्नेह जय महाराष्ट्र, 30 जानेवारीला सकाळी 10 वाजता मुंबईतल्या राज्यस्तरीय पदाधिकारी मेळाव्यात भेटूया! अशा आशयाची पोस्ट राज ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पेजवरून केली आहे. त्यामुळे या दिवशी राज हे मनसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे ते या मेळाव्यात नक्की कशावर बोलणार याची उत्सुकता लागली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world