विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. अजित पवारांची सध्या जन सन्मान यात्रा सुरू आहे. लाडकी बहीण योजनेचाही डंका वाजवला जात आहे. जास्तीत जास्त जागा जिंकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक आमदाराला ताकद देण्याचे काम सुरू आहे. अशात अजित पवारांना पक्षातला एक जेष्ठ आमदार माजी मंत्री टाटा बाय बाय करण्याच्या तयारीत आहे. त्यांनी तशी कबुलीच दिली आहे. आपले नेते हे शरद पवारच आहेत. शिवाय गेल्या अडीच वर्षापासून नाईलाजाने अजित पवारांबरोबर आहे असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर हा आमदार शरद पवारांच्या पक्षात दाखल होवू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते म्हणून राजेंद्र शिंगणे यांची ओळख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवारां ऐवजी अजित पवारांना साथ दिली. मात्र त्यांना साथ का दिली याचं कारण त्यांनी आता सांगितलं आहे. शरद पवार हेच आपले नेते आहेत. त्यांच्या मुळेच आपण राजकारणात आहोत. त्यांच्याबाबत नेहमीच आदर राहाणार आहे. जिल्हा सहकारी बँक अडचणीत होती. त्यामुळेच गेली अडीच वर्षे नाईलाजाने अजित पवारां बरोबर होतो. आता बँकेला सरकारने पैसे दिले आहेत. असे असले तरी आपले नेते शरद पवार आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं.
ट्रेंडिंग बातमी - '...तर लाडक्या बहिणीला दीड ऐवजी 3 हजार रुपये देऊ'
राजेंद्र शिंगणे यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करणार का हे स्पष्ट पणे जरी सांगितलं नसेल तरी, संकेत मात्र दिले आहे. शरद पवार हे बुलढाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पवारांची भेट घेतली. जरी अजित पवारांच्या गटात सामील झालो असलो तरी मागील दोन अडीच वर्षांपासून शरद पावरांशी संबंध तोडले नाहीत असेही ते म्हणाले. शरद पवार हेच राज्याला आणि देशाला आश्वासक नेतृत्व देऊ शकता असंही ते यावेळी म्हणाले. हे सांगत असताना शरद पवार गटात जाणार का हे मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.
(नक्की वाचा- 'लाडकी बहीण' योजनेचे पैसे अजून खात्यात जमा झाले नाहीत? ही कारणे समजून घ्या)
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे त्यांनी अनेक वर्ष राजेंद्र शिंगणे यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. ते आघाडी सरकारमध्ये मंत्रीही होते. त्यांनी बुलढाणा लोकसभा मतदार संघाची निवडणूक ही राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती. मात्र त्यात त्यांना निसटता पराभव स्विकारावा लागला होता. जिल्ह्यातील एक ताकदवर नेते म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. जर त्यांनी अजित पवारांची साथ सोडली तर तो अजित पवारांसाठी मोठा धक्का असले. विदर्भातील हक्काचा चेहरा म्हणून शिंगणेंकडे पाहीले जाते.