स्वानंद पाटील, प्रतिनिधी
राज्यात पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत महायुतीमध्ये चर्चा सुरु आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत मोठं वक्तव्य केलं. राज्यात 2029 साली फक्त भाजपाचं सरकार येईल. तर या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल अशी घोषणा शाह यांनी केली होती. त्यांच्या या घोषणेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले अजित पवार?
'महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राजकीय, भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येतं. पण, महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. 1985 नंतरच्या चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आलं नाही.
गळ्यांना आपापला पक्ष वाढवायचा आहे. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी असं वक्तव्य करावं लागतं. त्यांना त्यांचा पक्ष सर्वात मोठा पक्ष करण्याचा अधिकार आहे, असं अजित पवारांनी सांगितलं. मी तिसऱ्या आघाडीचा चेहरा होईल, असं सांगितलं जातं. हे ऐकून आमची करमणूक होते. आमचे आम्हालाच कळत नाही. आमची ब्रेकिंग न्यूज तिथं चालत असते, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
( नक्की वाचा : 'राज्यात 2029 मध्ये फक्त भाजपा सरकार', अमित शाहांची घोषणा, 2024 साठी दिला मंत्र )
बीडच्या विकासाचा रोड मॅप
आमच्याकडे बीड जिल्ह्याचा विकासाचा रोड मॅप तयार आहे. माझ्या आणि धनंजय च्या हातावर बांधलेला राख्यांची शपथ घेऊन सांगतो राज्यातील माय माऊलींना काही कमी पडू देणार नाही, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. काही भागात घड्याळ काही भागात कमळ काही भागात धनुष्यबाण असून त्याच्या समोरचे बटन दाबा. 44 लक्ष शेतकऱ्यांची वीज बिल माफी 10 दिवसांत केली जाणार आहे. तुमच्या बिलावर शून्य आकडा येणार आहे, असंही अजित पवार यापूर्वी झालेल्या कार्यक्रमात बोलताना म्हणाले.