जाहिरात

Political news: सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस संपण्यासाठी कोण जबाबदार? खासदारांचा थेट हल्लाबोल

अजित पवार यांच्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी अर्थात शरद पवारांपासून दूर गेले होते.

Political news: सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस संपण्यासाठी कोण जबाबदार? खासदारांचा थेट हल्लाबोल
सोलापूर:

सोलापूर जिल्हा म्हटलं म्हणजे मोहिते पाटील घराण्याचे नाव आपोआप तोंडाव येतं. या घराण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एक ताकद जिल्ह्यात होती. पण काही काळ हे घराणे राष्ट्रवादी काँग्रेसपासून दुरावले होते. त्यांनी भाजपची साथ दिली होती. एक प्रकार मोठं खिंडार जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्ह्यात झालेली वाताहत याला एकच व्यक्ती कारणीभूत असल्याचं माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले आहे. त्यांनी अजित पवारांचे नाव घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 

जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची 2009 पासून ते 2024 या काळापर्यंत वाट लागली गेली असं मोहिते पाटील म्हणाले. अनेक लोक कात्री घेऊन बसले होते. ज्यांच्या त्रासामुळे आम्ही शरद पवार साहेबांपासून लांब गेलो अशी कबूली धैर्यशिल मोहित पाटील यांनी दिली. मात्र 2024 साली जयंत पाटील यांच्यामुळे आम्ही पुन्हा पक्षाच्या जवळ आलो. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार आणि खासदार महाविकास आघाडीचे निवडून आले. असे सांगत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांचे नाव न घेता त्यांना डिवचले आहे. 

नक्की वाचा - Exclusive : अख्खं गाव रेबीजचं इंजेक्शन घेण्यासाठी रुग्णालयात, छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा गावात काय घडलं?

अजित पवार यांच्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादी अर्थात शरद पवारांपासून दूर गेले होते. मात्र अजित पवार दूर होताच जयंत पाटलांमुळे आम्ही पुन्हा पक्षाच्या जवळ आलो असल्याचे अप्रत्यक्षपणे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले. तसेच अजित पवार यांचे नाव न घेताच त्यांच्याच कात्रीमुळे सोलापूर जिल्ह्याची आणि राष्ट्रवादी पक्षाची वाट लागली असल्याचेही खासदार मोहिते पाटील म्हणाले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध अजित पवार असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली. 

नक्की वाचा- NCP Crisis: 'राष्ट्रवादीच्या फुटीआधी भाजपशी चर्चा..', अजित पवार गटाची पहिल्यांदाच मोठी कबुली

राष्ट्रवादीचे नूतन जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख यांच्या सत्कार वेळी पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुफान राजकीय टोलेबाजी केली. विजयसिंह मोहिते पाटील यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे प्रस्थ होते. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्रीपद ही भूषवले होते. त्यांचे पक्षातले वजन ही वाढत होते. पण त्यांच्या वाढत्या उंचीला कमी करण्याचे काम अजित पवारांनी केल्याचे बोलले जाते. त्यांच्या या त्रासालाच कंटाळून मोहिते पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडली होती. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com