'अजित पवारांनी भ्रष्टाचारी वृत्तीची पिढी तयार केली' दादांचा खंदा समर्थक भडकला

चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपलाच जाणार हे निश्चित आहे. अजित पवारांनीही त्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पिंपरीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं राजकीय भगदाड पडलं आहे. गव्हाणे, लांडेंनंतर आता भाऊसाहेब भोईरांनी ही राष्ट्रवादीला रामराम ठोकत अजित पवारांवर गंभिर आरोप केले आहेत. शिवाय आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचेही जाहीर केले आहे. भोईर हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. भाऊसाहेब हे अजित पवारांचे अत्यंत जवळचे मानले जात होते. पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील केंद्री बिंदू म्हणून भाऊसाहेब भोईर यांच्याकडे पाहीले जात होते. त्यामुळे अजित पवारांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच एका मागोमाग एक धक्के बसत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

भाऊसाहेब भोईर हे अजित पवारांचे जवळचे आणि मर्जीतले नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र त्यांनी आता अजित पवारांपासून फारकत घेतली आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांवर मात्र जोरदार टिका केली. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये सरड्यांचे डायनोसर केले अशी घणाघाती टिका त्यांनी केली. भोईर यांनी राष्ट्रवादीला रामराम करताना अनेक कार्यकर्त्यांना आपल्या बरोबर घेतले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांसाठी हा मोठा धक्काच समजला जात आहे.  

ट्रेंडिंग बातमी - बदलापूर प्रकरण: संस्थाचालकांना 44 दिवसानंतर अटक, आज कोर्टात नेणार, अटकेचा A TO Z थरार

मागील तीन दशकं भाऊसाहेब भोईर हे पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील केंद्रबिंदू राहिले आहेत. आपण अनेकवेळा अजित पवारांवर विश्वास ठेवला. मात्र त्यांनी वेळोवेळा आपला विश्वासघात केला, असा हल्लाबोल त्यांनी केला. शिवाय दुसरीकडे भ्रष्टाचारी वृत्ती असलेल्यांची एक पिढी अजित पवारांनीच निर्माण केली असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला. भोईर यांनी पक्षाला रामराम करताना आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात हा आरोप केला. 

ट्रेंडिंग बातमी - अंगावर दूध येत नाही म्हणून 5 महिन्याच्या बाळासह डॉक्टर आईचं टोकाचं पाऊल

पिंपरी चिंचवडमध्ये भाऊसाहेब भोईर यांची मोठी ताकद आहे. त्या दृष्टीने त्यांनी मोठे शक्तप्रदर्शनही केले. आपला निर्धार व्यक्त करण्यासाठी  भोइर यांनी मेळाव्याचे आयोजित केले होते. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी बोलताना आगामी काळातील वाटचालीचा त्यांनी उल्लेख केला. यावेळी काही झाले तर विधानसभा निवडणूक लढणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. 

ट्रेंडिंग न्यूज - LIVE UPDATE: बदलापूर प्रकरणातील अटक संचालकांना कोर्टात हजर करणार

चिंचवड विधानसभा मतदार संघात भाजपचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे ही जागा भाजपलाच जाणार हे निश्चित आहे. अजित पवारांनीही त्यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले आहे. अशा वेळी आपल्याला राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार नाही हे भोईर यांना समजले. त्यामुळेच त्यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिले आहे. शिवाय विद्यमान आमदारांनाही आपण मैदानात उतरत असल्याचे सांगितले आहे.