जाहिरात

अंगावर दूध येत नाही म्हणून 5 महिन्याच्या बाळासह डॉक्टर आईचं टोकाचं पाऊल

आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला अंगावर दूध येत नव्हते. त्यामुळे ती बाळाला दूध देवू शकत नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात गेली होती.

अंगावर दूध येत नाही म्हणून 5 महिन्याच्या बाळासह डॉक्टर आईचं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजीनगर:

सर्वांनाच एक धक्का देणारी घटना छत्रपती संभाजीनगर मधील पैठणमध्ये घडली आहे. इथं एक डॉक्टर आईनं आपल्या 5 महिन्याच्या बाळासह आत्महत्या केली आहे. याघटनेनं सर्वच जण हादरून गेले आहेत. या मागचे कारण त्या पेक्षाही धक्कादायक आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेला अंगावर दूध येत नव्हते. त्यामुळे ती बाळाला दूध देवू शकत नव्हती. त्यामुळे ती नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे असे बोलले जात आहे. याबाबत पोलिस अधित तपास करत आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

डॉ. पूजा व्होरकटे या पैठणमध्ये राहात होत्या. त्यांनी प्रभाकर व्होरकटे यांच्या बरोबर काही वर्षापूर्वी लग्न केले होते. पाच  महिन्यांपूर्वी त्यांना एक बाळ झाले. बाळाचा जन्म झाल्यापासून डॉ. पूजा व्होरकटे बाळाची काळजी घेत होत्या. मात्र त्यांना अंगावर दूध येत नव्हते. त्यामुळे त्यांना बाळाला दूध पाजता येत नव्हते. याचा त्रास त्यांना होत होता. त्याचा सतत विचार त्यांच्या डोक्यात येत होत्या. त्यात  गेल्या आठ दिवसांपासून त्या डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. 

ट्रेंडिंग न्यूज - LIVE UPDATE: बदलापूर प्रकरणातील अटक संचालकांना कोर्टात हजर करणार

बाळाच्या काळजी पोटी अनेक विचार त्यांच्या मनात येत होते. त्यातून त्यांनी मागचा पुढचा कोणताही विचार न करता टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी थेट आपल्या पाच महिन्याच्या चिमुकल्यासह आत्महत्याच केली. दूध येत नसल्यानेच हे पाऊल त्यांनी उचलल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. मात्र एक डॉक्टर महिला केवळ अंगवार दूध येत नाही. ते बाळाला पाजता येत नाही या कारणाने आत्महत्या करते याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा तर्क लढवले जात आहे. त्यामुळे पोलिसही आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
कसब्यात भाजपाचा उमेदवार कोण? कार्यकर्त्यांमध्ये पोस्टर वॉर, तर नेते म्हणतात...
अंगावर दूध येत नाही म्हणून 5 महिन्याच्या बाळासह डॉक्टर आईचं टोकाचं पाऊल
central-railway-new-timetable-effective-from-october-5-key-changes-and-updates
Next Article
मध्य रेल्वेवर 5 ऑक्टोबरपासून नवे वेळापत्रक, काय आहेत बदल?