भारतीय जनता पक्षाचे अधिवेशन शिर्डीत पार पडले. या अधिवेशनात भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर त्यांनी टीकेची झोड उठवली. शिवाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. विधानसभेत विजय मिळवला आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही विरोधकांचा सुपडा साफ करा असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना करा. पंचायत ते पार्लमेंट केवळ भगवा दिसला पाहीजे असंही ते यावेळी म्हणाले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
महाराष्ट्रात मिळालेला विजय हा अभूतपुर्व आहे. या विजयाने देशाच्या राजकारणाची दिशा बदलली असं वक्तव्य अमित शहा यांनी यावेळी केलं. 2024 हे वर्ष भाजपसाठी महत्वाचं ठरलं. एकामागू एक राज्य भाजपनी जिंकली. त्यात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे असंही ते म्हणाले. या निवडणुकीने देशाला दाखवून दिले की दगाफटक्याचे राजकारण चालत नाही. शरद पवारांनी महाराष्ट्रात 1978 पासून दगाफटक्याचे राजकारण केले. त्या विचारांना महाराष्ट्रातल्या जनतेने जमिनीत गाडलं. उद्धव ठाकरेंनी द्रोह केला. विचारधारा सोडली. त्यांना ही त्यांची जागा तुम्ही दाखवून दिली असं यावेळी अमित शहा म्हणाले.
भाजप बरोबर विश्वासघात करण्याचं धाडस यापुढे कोणी करणार नाही असाच हा विजय असल्याचं ते म्हणाले. हे सांगत असताना त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही सुचक इशारा दिला आहे. महाराष्ट्रात नेहमीच अस्थिर राजकीय स्थिती राहीला आहे. पण पहिल्यांदाच एवढं मोठं बहुमत देत स्थिर सरकार स्थापन झालं आहे असं ते म्हणाले. लोकसभेनंतर विधानसभा ही जिंकू असं विरोधकांना वाटत होतं. पण त्यांचे स्वप्न तुम्ही धुळाला मिळवले. या विजयाचे खरे शिल्पकार हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांच मी आभार मानतो असं ही ते म्हणाले. शिवाय लाडक्या बहीणी आणि शेतकऱ्यांचे आभारही त्यांनी यावेळी मानले.
या निवडणुकीने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना घरी बसवले आहे. राज्यातील सर्वच विभागात महायुतीने विजय मिळवला आहे. शिवाय एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिवाय अजित पवारांची राष्ट्रवादी हीच खरी राष्ट्रवादी आहे यावरही शिक्कामोहर्तब झाल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्र हा मोदेंची विचार मानणार आहे. शिवाय सनातन संस्कृती आणि हिंदूत्वला ही मानतो यावर आज पुन्हा एकदा शिकामोहर्तब झाल्याचं ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी -सोलापूर-धाराशिव जिल्ह्यात दिसलेल्या त्या वाघाला जेरबंद करण्याचे वन विभागाचे आदेश
शरद पवार अनेक वर्ष सत्तेत होते. पण त्यांना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आल्या नाहीत. पण आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचवणार आहोत असं ते म्हणाले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला प्रचंड यश प्राप्त करायचे आहे. त्याच्या तयारीला लागा. एकही जागा विरोधकांना मिळाली नाही पाहीजे असं काम कराल. पंचायत ते पार्लमेंट फक्त भगवा दिसला पाहीजे असं ही ते म्हणाले. त्याच वेळी खऱ्या अर्थाने विकास होईल असंही त्यांनी सांगितलं. भाजपची वियजी यात्रा कायम ठेवा. भाजपला अजेय बनवा असं आवाहन ही त्यांनी या निमित्ताने केले. भाजपने जी जी आश्वासनं दिली ती पुर्ण केली आहेत असंही ते म्हणाले.
महाराष्ट्रातील विजयानंतर इंडिया आघाडीत बिघाडी होत आहे. घमंडिया गठबंधन आता तुटत चाललं आहे. त्यांचा आत्मविश्वास पुर्ण पणे ढासळला आहे. त्यामुळेच मुंबईत शिवसेना वेगळं लढण्याचं बोलत आहे. दिल्लीत आप विरोधात काँग्रेस आहे. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस विरुद्ध तृणमुल काँग्रेस आहे. तर बिहारमध्येही लालूप्रसाद यादव अस्वस्थ आहेत. हे सर्व होण्याला महाराष्ट्रातला विजय महत्वाचा असल्याचं ही ते म्हणाले. दरम्यान 8 तारखेला फटाके तयार ठेवा. दिल्लीत ही भाजपचे सरकार बनणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2024 चा शेवट महाराष्ट्र विजयाने झाला तर 2025 ची सुरूवात दिल्ली विजयाने होणार असल्याचं ते म्हणाले.