'अमित शहा नाही तर हे अहमद शाह अब्दाली', ठाकरे थेट भिडले

हे सरकार उलथवून टाकायचे आहे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. ही केवळ सत्तेची लढाई नाही, तर महाराष्ट्राची लुट थांबवण्याची ही लढाई आहे. त्यामुळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत ते मविआच्या बाजून उभे राहातील असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.

Advertisement
Read Time: 3 mins
नागपूर:

उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन्स क्लबचे अध्यक्ष आहेत, या अमित शाह यांच्या टिकेचा उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. अमित शाह हे अहमद शहा अब्दाली आहेत. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवा असे सांगितले आहे. पण हे बंद दाराआडचे धंदे सोडा. हिंम्मत असेल तर मैदानात या. हिंम्मत असेल तर शिवसेना संपवून दाखवा असे आव्हान ठाकरे यांनी यावेळी दिले. तुम्हा महाराष्ट्र गिळायला निघाला आहात. पण महाराष्ट्र प्रेमी तुमचा कोथळा बाहेर काढल्या शिवाय राहाणार नाही अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना फटकारले आहे. रामटेक इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण उद्धव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उद्धव ठाकरे यांना दिल्लीतील कोणीही घरी बसवू शकत नाही. उद्धव ठाकरेंना जर कोणी घरी बसवेल तर ती या महाराष्ट्रातील जनता आहे. मला जनतेने सांगितलं घरी बसा तर मी घरी बसेन. अमित शहा मला घरी बसवू शकत नाहीत असेही ठाकरे यावेळी म्हणाले. अमित शाह मला घरी बसवायला सांगत असतील तर त्यांनाच ही जनता घरी बसवेल असेही उद्धव यावेळी म्हणाले. आगामी विधानसभा निवडणूक जिंकायची म्हणजे जिंकायची असेही ते यावेळी म्हणाले. लोकसभेला भाजपला हरवले आहे. आता विधानसभेलाही यांना हरवायचं आहे असेही ते म्हणाले.    

ट्रेडिंग बातमी - '... तर शरद पवार पंतप्रधान झाले असते', सुशिलकुमारांनी सांगितला भन्नाट किस्सा

भाजप नेहमी हिंदूत्वावर बोलत असतात. 2014 साली याच भाजपने देशात त्यांचा पंतप्रधान झाल्यावर कसलाही विचार न करता युती तोडली होती. त्यावेळी आम्ही हिंदू होतो की नव्हतो असा प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केला. त्यावेळी जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात होती. दोन चार जागांचा प्रश्न होता. त्या वेळी एकनाथ खडसे यांनी फोन करून युती तोडल्याचे सांगितले. केंद्रीय नेत्यांनी तशा सुचना केल्याचेही ते म्हटले असं यावेळी उद्धव यांनी सांगितले. मात्र त्याानंतर शिवसेना स्वबळावर निवडणूक लढली. त्यावेळी 63 आमदार निवडून आणले. त्यावेळी शिवसेनेची ताकद भाजपला दिसली. 

ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील काँग्रेसच्या मार्गावर? 'भाजपमध्ये जाऊन चूक केली' बडा नेता थेट बोलला

लाडकी बहीण योजनेवरही यावेळी उद्धव ठाकरे बोलले. महिला म्हणत आहेत गद्दारांना पन्नास खोके आणि आम्हाला पंधराशे रूपये. मोदींनी तर  पंधरा लाख देणार असे सांगितले होते. या पंधरा लाखाचे पंधराशे रूपये कसे झाले अशी विचारणाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. जे पैसे लाडक्या बहीणींना दिले जात आहेत ते कोणी स्वत:च्या खिशातून देत नाही. तर ते सरकारचे तुमच्या आमच्या टॅक्समधून आलेले पैसे आहे. मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली. पण सरकारी पैशाची उधळपट्टी करत त्याचे कार्यक्रम कधी केले नाहीत, असेही उद्धव यावेळी म्हणाले.  

ट्रेंडिंग बातमी - एकनाथ शिंदेंच्याच गडात सेना-भाजप वाद पेटला, थेट खंजीर खूपसण्याची भाषा

हे सरकार उलथवून टाकायचे आहे असे आवाहन ठाकरे यांनी यावेळी केले. ही केवळ सत्तेची लढाई नाही, तर  महाराष्ट्राची लुट थांबवण्याची ही लढाई आहे. त्यामुळे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत ते मविआच्या बाजून उभे राहातील असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. मी मुख्यमंत्री असताना एकही उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जावू दिला नाही. आता मात्र एकामागून एक उद्योग गुजरातला जात आहेत असा आरोप यावेळी त्यांनी केला. शिवाय आगामी विधानसभा निवडणुकीत रामटेकच्या सहा पेकी सहा जागा जिंकायच्या आहेत असेही ते यावेळी म्हणाले. जो उमेदवार असेल तो महाविकास आघाडीचा उमेदवार असेल त्याला सर्वांनी मिळून विजयी करा असेही ते म्हणाले. दरम्यान दसऱ्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.