भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मनात सध्या काय सुरू आहे याचा कोणीही ठाव घेवू शकत नाही. महायुतीत इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील अस्वस्थ आहेत. त्यांनी आगामी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपकडून तिकीट नाही मिळालं तर ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत ही आहेत. शिवाय अपक्ष म्हणून निवडणूक लढता येईल का याचीही ते चाचपणी करत आहेत. मात्र आता एक वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये परतणार असंही बोललं जात आहे. त्याला निमित्त आहे काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे वक्तव्य. त्यामुळे पाटील काँग्रेस राष्ट्रवादी की अपक्ष याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि हर्षवर्धन पाटील यांचे जूने सहकारी बाळासाहेब थोरात यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, हर्षवर्धन पाटील माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्यामध्ये मोठी क्षमता आहे. हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये जाऊन चूक केली की काय ? असे वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता जरी हर्षवर्धन भाजपात गेले असले तरी, ते पुन्हा मुख्य रस्त्यावर येतील. असा विश्वास काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.
हर्षवर्धन पाटील सध्या भाजपा सोडून महाविकास आघाडीकडे येणार अशी चर्चा आहे. या चर्चेमध्ये जाता बाळासाहेब थोरात यांनी हर्षवर्धन पाटील पुन्हा मुख्य रस्त्यावर येतील. असा विश्वास व्यक्त केलाय. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे महाविकास आघाडीमध्ये आल्यास एक प्रकारे स्वागत होताना दिसत आहे. मात्र हर्षवर्धन पाटील यांच्या मनात काय आहे हे अजून कोणालाही समजले नाही. मात्र गेल्या काही दिवसापासून पाटील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यां बरोबर जवळीक वाढली आहे. त्यामुळे ते एक प्रकराचे संकेत आहेत का अशीही चर्चा आहे.
दरम्यान आपण मागच्या निवडणुकीत फडणवीस यांना सल्ला दिला होता. आरशात बघा तुम्हाला विरोधी पक्ष नेता दिसेल. आताही सांगतो येत्या निवडणुकीत महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. त्यांनी कोणाला विरोधी पक्ष नेता करावे. याची चर्चा आता सुरू केली पाहिजे. असा टोला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना लगावला. पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी बाळासाहेब थोरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबरच देवेंद्र फडणवीसांवरही वक्तव्य केले.
(नक्की वाचा- लोकसभेच्या निकालानंतर महायुती सरकार 'टॉप गियर'वर; योजना, विकासकामांचा धडाका)
राज्यात महाविकास आघाडीला 180 पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे मविआला ताकतीचे बहुमत मिळणार आहे असं ही ते म्हणाले. मुख्यमंत्री पदावरून आमच्यात मतभेद नाहीत. बहुमत आल्यावर आम्ही एकत्र बसून मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय घेऊ, असेही थोरात यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी मधील जागा वाटपात 125 पेक्षा जास्त जागांवर एकमत झाले आहे. अजूनही चर्चा सुरू आहे. जागा वाटपात कोणताही वाद आघाडीत नाहीत. असेही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world