जाहिरात

VIDEO : "वाल्मीक अण्णानी सांगितलंय तुला जीवे मारुन टाकायचं", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडीओने खळबळ

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परळीतील मयत सरपंच बापू आंधळे खून प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

VIDEO : "वाल्मीक अण्णानी सांगितलंय तुला जीवे मारुन टाकायचं", जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडीओने खळबळ

स्वानंद पाटील, बीड

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परळीतील मयत सरपंच बापू आंधळे खून प्रकरणाशी संबंधित एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ महादेव गित्ते याचा असून 29 जून 2024 रोजी परळी तालुक्यातील मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खुनाशी संबंधित आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

सरपंच आंधळे यांच्यावर झालेल्या गोळीबारादरम्यान महादेव गित्ते याच्यावर देखील गोळीबार झाला होता. यात तो जखमी झाला होता. यादरम्यान रुग्णालयात दाखल केले असता महादेव गित्ते याने व्हिडिओ चित्रेत केला होता. ज्यात गित्तेने घडलेला प्रकार सांगितला आहे. 

(नक्की वाचा-  वाल्मीक कराडचे थेट पोलीस निरीक्षकासोबत संभाषण, ऑडिओ क्लिप व्हायरल, काय आहे बीड कनेक्शन?)

"29 जून 2024 रोजी महादेव गित्ते याच्यावर वाल्मीक कराड याच्या सांगण्यावरून हल्ला झाला. जखमी इसमाचा आंबेजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असताना 2 जुलै 2024 रोजी महादेव गित्ते याने बनवलेला व्हिडीओ", असं या ट्वीटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. 

(नक्की वाचा-  Sharad Pawar News: आधी एका मंचावर आले नंतर बंद दाराआड चर्चा, पवार काका-पुतण्याचं चाललंय काय?)

सरपंच बापू आंधळे खून प्रकरणात परस्परविरोधी गुन्हा दाखल झाला होता. ज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गित्ते आणि वाल्मीक कराड याचा देखील समावेश होता. मात्र ठोस पुराव्याअभावी वाल्मीक कराडची निर्दोष मुक्तता झाली होती. आता जितेंद्र आव्हाड यांनी महादेव गीते याचा हा व्हिडिओ ट्वीट करून पुन्हा एकदा सरपंच बापू आंधळे खून प्रकरण पुढे आणले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com