विधानसभा निवडणुकीत उतरणार आणखी एक ठाकरे? मनसेच्या बैठकीत काय झालं?

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.  या निवडणकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते आणि सरचिटणीसांटी बैठक मुंबईमध्ये झाली. या बैठकीत पक्षाचे प्रमुख नेते,सरचिटणीस यांनी स्वतः निवडणूक लढवावी असा बैठकीत सूर उमटला. त्यानंतर मनसे नेते अमित ठाकरे आगामी निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ठाकरेंची तयारी 

युती आघाडी याचा विचार न करता पक्ष कार्यकर्त्यांनी झोकून देत स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीचे करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. प्रत्येक नेत्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले पाहिजे मी कुठूनही निवडणूक लढण्यास तयार आहे, असं अमित ठाकरे यांनी या बैठकीत जाहीर केलं. 

माहीम, मागठाणे आणि भांडूप या मतदारसंघातून अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी मनसे कार्यकर्त्यांची मागणी आहे. मुंबईतील या तिन्ही मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या मोठी आहे. त्याचा पक्षाला फायदा मिळेल असं मानलं जात आहे.

 ( नक्की वाचा : राज ठाकरेंचा मुस्लीम विरोध मावळला? मनसेने नेमकं काय केलं? 'त्या' गोष्टीची सर्वत्र चर्चा )
 

ठाकरे आणि निवडणूक

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी देखील आजवर कधीही विधानसभा निवडणूक लढवलेली नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेवर निवड झाली होती.

ठाकरे घराण्यात आजवर फक्त आदित्य ठाकरे यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आहे. 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आदित्य मुंबईतील वरळी मतदारसंघातून विजयी झाले होते.

Topics mentioned in this article