जाहिरात

राज ठाकरेंचा मुस्लीम विरोध मावळला? मनसेने नेमकं काय केलं? 'त्या' गोष्टीची सर्वत्र चर्चा

राज ठाकरे यांची मुस्लीम विरोधी भूमिका आता मवाळ झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे मनसेचे नेते दिलीप धोत्रे.

राज ठाकरेंचा मुस्लीम विरोध मावळला? मनसेने नेमकं काय केलं? 'त्या' गोष्टीची सर्वत्र चर्चा
पंढरपूर:

संकेत कुलकर्णी

मशिदीवरील भोंग्यांना विरोध करणाऱ्या मनसेच्या राज ठाकरे यांची मुस्लीम विरोधी भूमिका आता मवाळ झाली आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आयोजित केलेली एक धार्मिक यात्रा. त्यांनी पंढरपुरातील एक हजार मुस्लीम बांधवांना अजमेर दर्शन घडवलं आहे. विधानसभेच्या तोंडावर सोशल इंजिनिअरिंगचा राज्यातील पहिलाच प्रयोग या माध्यमातून मनसेने केला आहे. मात्र याचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे मनसेने पुन्हा आपली भूमिका बदलली का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रखर हिंदुत्ववादी आणि मुस्लिम विरोधी अशी राज ठाकरे यांच्या मनसेची ओळख गेल्या काही वर्षात निर्माण झाली होती. मशिदी वरील भोंगे असतील किंवा राज ठाकरे यांच्या भाषणातून होणाऱ्या थेट टीका असतील. यावरून मुस्लीम समाज हा मनसेचा विरोधात गेला होता. अशातच विधानसभेला मुस्लीम मतांना जवळ करण्यासाठी आता अजमेर यात्रेसारखे फंडे वापरून सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. तसा पहिला प्रयत्न पंढरपूरमध्ये झालेला दिसतो. या ठिकाणी पक्षाचे नेते दिलीप धोत्रे यांनी मुस्लिमांना अजमेर शरिफची यात्रा घडवून आणली आहे.   

ट्रेंडिंग बातमी - 'आम्हाला बांबू लावायचं काम सुरू' सर्वां समोर अजित पवार असं का म्हणाले?

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची राज्यातील पहिली उमेदवारी दिलीप धोत्रे यांच्या रूपाने राज ठाकरे यांनी जाहीर केली होती. याच दिलीप धोत्रे यांनी आता 1 हजार मुस्लीमांना सोबत घेऊन अजमेर यात्रा काढली आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मुस्लीम मतांना जवळ करण्याचा मनसेचा प्रयोग हा राज्यातील पहिलाच मानला जातोय. या निमित्ताने हिंदुत्ववादी पक्ष आता महाविकास आघाडीकडे जाणारी मुस्लीम मते काबीज करण्यासाठी आखाड्यात उतरलेली दिसून येत आहेत. 

ट्रेंडिंग बातमी - अजित पवार म्हणतात मीच साहेब, कोल्हे म्हणाले राज्यात फक्त 2 साहेब, एक बाळासाहेब दुसरे...

दिलीप धोत्रे हे राज ठाकरे यांचे जवळचे मानलो जातात. मनसेच्या काही उमेदवारांची घोषणा राज ठाकरे यांनी केली. त्यात दिलीप धोत्रे यांचे नाव होते. ते पंढरपूर विधानसभा मतदार संघातून मनसेकडून निवडणूक रिंगणात असतील. या निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून त्यांनी ही यात्र घडवून आणली. शिवाय मुस्लीम मतदारांना आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न केला. या मतदार संघात मुस्लीम मते ही निर्णायक आहेत. लोकसभा निवडणुकीत ही मतं महाविकास आघाडीच्या पारड्यात गेल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचा फटका महायुतीला बसला. त्यात आता मनसेनेही या मतदारांना चुचकारले आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन
राज ठाकरेंचा मुस्लीम विरोध मावळला? मनसेने नेमकं काय केलं? 'त्या' गोष्टीची सर्वत्र चर्चा
Deoli Assembly Constituency Charulata Tokas, sister of Congress MLA Ranjit Kamble, congress-candidacy-request
Next Article
पाच वेळा आमदार असलेल्या भावाच्या मतदार संघावर बहिणीचा दावा, पक्षाकडे मागितली उमेदवारी