Bhiwandi Mayor Election 2026: BJPने स्नेहा पाटील यांना उमेदवारी का दिली होती? रवींद्र चव्हाणांनी सांगितलं कारण

Bhiwandi Mayor Election 2026: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बंडखोरांवर कठोर कारवाईचे संकेत दिले असून उमेदवार का बदलला, याचा खुलासाही केला आहे. सविस्तर वाचा बातमी.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी मनपा निवडणुकीत भाजपने ऐनवेळेस उमेदवार का बदलला?"
IANS

Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीत भाजपमध्ये झालेल्या अभूतपूर्व बंडाळीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. या सर्व घडामोडींवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शुक्रवारी (20 फेब्रुवारी) सविस्तर भूमिका मांडली. सुरुवातीला नारायण चौधरी यांचेच नाव निश्चित असताना ऐनवेळी स्नेहा पाटील यांना उमेदवारी का देण्यात आली, याचा खुलासा चव्हाणांनी यावेळी केला.

ऐनवेळी उमेदवार का बदलला? चव्हाणांनी केला खुलासा

सुरुवातीला नाव निश्चित असूनही प्रदेश स्तरावर उमेदवारी बदलण्याचा निर्णय का घ्यावा लागला, यावर चव्हाणांनी प्रकाश टाकला. ते म्हणाले की, "निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक राजकीय घडामोडी वेगाने घडत होत्या. या सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रदेश स्तरावरून स्नेहा मेहुल पाटील यांना भाजपच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला नारायण चौधरी (Bhiwandi Mayor Narayan Chaudhari News) यांनाच महापौरपदाचा अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते. कोअर टीमनेही त्यांच्याच नावाचा प्रस्ताव दिला होता. पण स्थानिक पातळीवर काही वाद समोर आले. विशेषतः नारायण चौधरी आणि कोणार्क आघाडीचे प्रमुख यांच्यातील स्थानिक वादाची किनार याला होती. या वादामुळे उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला आणि दुसऱ्या कोणाला तरी उमेदवारी देण्याऐवजी स्नेहा पाटील यांचा विचार करण्यात आला होता". 

(नक्की वाचा: Bhiwandi News: भिवंडी मनपातील सत्ता गेल्यानं BJP आक्रमक! बंडखोरांना बसणार दणका, रवींद्र चव्हाणांचे मोठे संकेत)

पक्षादेश डावलणाऱ्यांवर होणार कारवाई

ज्या नगरसेवकांनी पक्षाचा 'व्हीप' डावलून मतदान केले, त्यांच्यावर भाजप आता कठोर कारवाई करण्याच्या तयारीत आहे. या बंडखोरीमुळे भिवंडीतील भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण असून, प्रदेशाध्यक्षांच्या या खुलाशामुळे स्थानिक राजकारणात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

(नक्की वाचा : Bhiwandi Mayor Election 2026: भिवंडी महापालिकेत सत्तापालट; भाजपचे बंडखोर नारायण चौधरी नवे महापौर)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवीेद्र चव्हाण काय म्हणाले ऐका, VIDEO