राज्यात राजकीय घडामोडीला वेग, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विनोद तावडेंच्या निवडीचे संकेत

एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची निवड होत असताना, विनोद तावडेंसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

एकीकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची निवड होत असताना, विनोद तावडेंसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ विद्यमान सरचिटणीस विनोद तावडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. यापूर्वी अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांचीही पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यापूर्वी उत्तर प्रदेश, बिहारच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली होती. 
त्यामुळे तावडेंची नियुक्ती करून पक्षश्रेष्ठींनी त्या दृष्टीने संकेत दिल्याचे मानले जात आहे. 

नक्की वाचा - मोठी बातमी! 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता, भाजपच्या दिग्गजांचा पत्ता कट होणार?

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची माळ विद्यमान सरचिटणीस विनोद तावडे यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. त्यांची उत्तर प्रदेश आणि बिहार या मोठ्या राज्यांच्या केंद्रीय निरीक्षकपदी निवड करून पक्षश्रेष्ठींनी तसे संकेत दिल्याचे मानले जात आहे. यापूर्वी अमित शाह आणि जे.पी.नड्डा यांचीही पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यापूर्वी उत्तर प्रदेश, बिहारच्या केंद्रीय निरीक्षकपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पदोन्नती करण्यात आली होती. 

त्यामुळे तावडेंची नियुक्ती करून पक्षश्रेष्ठींनी त्या दृष्टीने संकेत दिल्याचे मानले जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले असून ही निवडणूक फेब्रुवारीच्या अखेरीस म्हणजेच दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर होणार आहे. आधी भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आता राष्ट्रीय निवडणूक अधिकारी आणि राज्य शाखेच्या समन्वयासाठी केंद्रीय निरीक्षकांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआधी नालासोपारा येथील तथाकथित पैसे वाटपाच्या आरोपांमुळे तावडे देशभर चर्चेत आले. पण राज्यात देदीप्यमान यश मिळाल्याने तावडे यांचे पक्षातील महत्त्व वाढले आहे.

Advertisement

नक्की वाचा - ​​​​​​​राज्यातील 3,513 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, भाजपचा एकही उमेदवार नाही!

फडणवीसांचे होर्डिंग्स चर्चेत...
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून एकनाथ शिंदे यांनी माघार घेताच छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री उल्लेख असणारे होर्डिंग लावण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे यासाठी दोन दिवसापूर्वी संभाजीनगरच्या सुपारी हनुमान मंदिरात भाजपकडून महाआरती देखील करण्यात आली होती. सोबतच फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे अशी मागणी भाजपच्या राज्यभरातील पदाधिकाऱ्यांकडून केले जात होती. त्यामुळे भाजपमध्ये उत्साहात वातावरण असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार याबाबत आता होर्डिंग लावण्यात येत आहे..