जाहिरात

मोठी बातमी! 2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता, भाजपच्या दिग्गजांचा पत्ता कट होणार?

भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी!  2 तारखेला महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता, भाजपच्या दिग्गजांचा पत्ता कट होणार?
मुंबई:

सागर कुलकर्णी, प्रतिनिधी

भाजपच्या मुख्यमंत्री शपथविधीचा मार्ग मोकळा झाल्यानंतर  2 तारखेला भाजप महायुतीचा शपथविधी पार पडण्याची शक्यता आहे. भाजप महायुतीच्या संभाव्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज नेत्यांना पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ही दोन्ही पदं देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच कायम राहण्याची शक्यता आहे. महायुती भाजपाच्या मंत्रिमंडळात यंदा या नेत्यांना मंत्रिपदावरून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

राज्यातील 3,513 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, भाजपचा एकही उमेदवार नाही!

नक्की वाचा - राज्यातील 3,513 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, भाजपचा एकही उमेदवार नाही!

गिरीष महाजन  -  देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळख, उत्तर महाराष्ट्र- नाशिक इथ लोकसभा आणि विधानसभेतही चांगल काम पण उत्तर महाराष्ट्रात यंदा नव नेतृत्व निर्माण करण्याची शक्यता

सुधीर मुनंगटीवार - पूर्व विदर्भातील चेहरा पण लोकसभेतील पराभव तसंच याआधी कॅबिनेटमध्ये वित्त, वन, सांस्कृतिक खात्याचं काम पाहिलं. यंदा पूर्व विदर्भात नवीन चेहरा नेतृत्व देण्याच्या हालचालीमुळे मुनंगटीवार यांना कॅबिनेट मिळणार का याकडे लक्ष 

चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

महायुती सरकारचा 100 दिवसांचा कार्यक्रम ठरणार; शासन दरबारी हालचालींना वेग

नक्की वाचा - महायुती सरकारचा 100 दिवसांचा कार्यक्रम ठरणार; शासन दरबारी हालचालींना वेग

कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी?

राधाकृष्ण विखे पाटील- नगरमध्ये बाळासाहेब थोरातांसारख्या दिग्गज नेत्यांचा पराभव होण्यामागे विखे पाटलांचा मोठा वाटा आहे. अमित शाहांचे  निकटवर्तीय म्हणून ओळख असलेले विखे पाटील यांना महसूल सारखे महत्त्वाचे किंवा अन्य खाते मिळेल याकडे सर्वांचच लक्ष आहे. 

आशिष शेलार - मुंबई भाजप अध्यक्ष, मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शेलार यांना मुंबईतून संधी दिली जाऊ शकते. 

रविंद्र चव्हाण - कोकण आणि ठाणे जिल्ह्यातील लोकसभा विधानसभेत 100 टक्के स्ट्राईक रेट 

मंगलप्रभात लोढा - अतुल भातखळकर यांना मुंबईतून कॅबिनेट म्हणून संधी मिळण्याची शक्यता 

पंकजा मुंडे - राज्यातील ओबीसी नेतृत्व मराठवाड्यात सर्वाधिक सभा मुंडेंच्या 

अतुल सावे - छत्रपती संभाजीनगर येथील महत्त्वाचं नाव. येता काळातील महानगर पालिकेच्या निवडणुका यात माळी समाजातून एकमेव नाव.

संजय कुटे - अभ्यासू ओबीसी चेहरा, देवाभाऊंचा विश्वासू चेहरा, पश्चिम विदर्भातून सलग पाचवी टर्म

माधुरी मिसाळ - पुणे शहरातून पर्वती मतदारसंघ विजयी, यंदा महिला प्रतिनिधी यातून संधीची शक्यता 

जयकुमार रावल - या आधी कॅबिनेटमध्ये काम, फडणवीसांचे निकटर्वीतय म्हणून ओळख , धुळे जिल्ह्यातून प्रतिनिधित्व 

राज्यमंत्रिपदावर कोणत्या नावाची चर्चा?

नितेश राणे - हिंदुत्वाच्या मुद्दावर संपुर्ण राज्यात आक्रमक भूमिका पार पाडली. राज्यभरात 50 पेक्षा जास्त सकल हिंदू मोर्चाला उस्फूर्त प्रतिसाद, भाजपचा आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा, कोकणात राणे कुटुंबीयांपैकी एक महत्वाचं नाव. 

गोपीचंद पडळकर -  भाजपमधील एकमेव विजयी धनगर आमदार, देवेंद्र फडणवीसांचा अतिशय विश्वासू, संघ परिवारातही उत्तम संवाद, 
आक्रमकतेसोबतच धनगर समाज पाठीशी, ऐन लोकसभेच्या तोंडावर ST आरक्षणाचा निर्णय धनगरांच्या विरोधात येऊनही धनगर समाज भाजपसोबतच राहिला

बंटी बागडिया - चंद्रपुर जिल्ह्यातून प्रतिनिधित्व  करतात, नवीन चेहरा मिहणून संधी अपेक्षित

Listen to the latest songs, only on JioSaavn.com