
Bihar Election Viral Video : बिहार विधानसभा निवडणुकीचं राजकारण आता तापू लागलंय. प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आता उमेदवारांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना समर्थकांची मोठी गर्दी होणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र बिहारमधील किशनगंज जिल्ह्यातील बहादूरगंज विधानसभा मतदारसंघात एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. येथील AIMIM पक्षाचे उमेदवार तौसीफ आलम यांनी अर्ज भरण्यापूर्वी बिर्याणी मेजवानी आयोजित केली होती. त्यावेळी त्यांच्या समर्थकांमध्ये बिर्याणी लुटण्यासाठी अक्षरशः झुंबड उडाली आणि मारामारी झाली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
नेमकं काय घडलं?
बहादूरगंज विधानसभा मतदारसंघातील AIMIMचे उमेदवार तौसीफ आलम यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या समर्थकांसाठी बिर्याणीची दावत (मेजवानी) आयोजित केली होती. मेजवानी सुरू होण्यापूर्वीच, शेकडो समर्थकांनी बिर्याणी घेण्यासाठी एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. ते बिर्याणी ठेवलेल्या जागेजवळ पोहोचले. घटनास्थळी पूर्णपणे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. लोकांनी ताट किंवा भांड्यांची पर्वा न करता थेट बिर्याणी काढायला सुरुवात केली.
( नक्की वाचा : Big News: मोठी बातमी! गुजरातमध्ये भाजपाचं 'धक्कातंत्र'; मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त सर्व मंत्र्यांचा राजीनामा )
व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, समर्थकांची गर्दी बिर्याणी लुटण्यासाठी एकमेकांच्या अंगावर चढत आहे आणि जसे जमेल तसे बिर्याणी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. काही लोक बिर्याणी उचलून तिथेच खाताना दिसले. बिर्याणी वाटपाचे कोणतेही नियोजन पाळले गेले नाही आणि समर्थक नेत्याच्या निर्देशांचे पालन न करता एकमेकांवर तुटून पडले.
हा सर्व प्रकार सुरु असताना तौसीफ आलम यांचे समर्थकांवर कोणतेही नियंत्रण नव्हते. बिर्याणीसाठी लुटालूट आणि मारामारी सुरूच राहिली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले आहे.
बिहार–
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) October 16, 2025
किशनगंज जिले की बहादुरगंज विधानसभा सीट से AIMIM प्रत्याशी तौसीफ आलम के नॉमिनेशन प्रोग्राम में बिरयानी के लिए लूट मची !! pic.twitter.com/1XUP45Hiyx
कोण आहेत तौसीफ आलम?
तौसीफ आलम हे बिहारमधील सीमांचल भागातील उमेदवार आहेत. त्यांनी यापूर्वी काँग्रेसकडून निवडणूक जिंकली आहे. पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा ते बिहारमधील सर्वात कमी वयाचे आमदार होते.मागील निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. या निवडणुकीत त्यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या 'AIMIM' पक्षाकडून आपले नशीब आजमावत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world