Bihar Election Exit Polls 2025 Live Updates: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान संपताच, बहुप्रतिक्षित एक्झिट पोलचे निकाल जाहीर झाले आहेत. वेगवेगळ्या सर्वेक्षण संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात पुन्हा एकदा राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) स्पष्ट बहुमतासह सरकार स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहेत एक्झिट पोल?
बिहार विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत आणि बहुमतासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. सध्या राज्यात एनडीएची सत्ता आहे, तर विरोधी पक्षात राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस, डावे पक्ष आणि व्हीआयपी (VIP) यांचा 'महागठबंधन' आहे. दोन्ही बाजूंनी विजयाचे दावे केले असले तरी, एक्झिट पोलच्या आकड्यांनी एनडीएच्या बाजूने झुकते माप टाकले आहे.
दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 67.14 टक्के नोंदवली गेली. दरम्यान, सत्ताधारी जनता दल युनायटेड (JDU) ने 'X' (माजी ट्विटर) वर एक मोठा दावा केला. त्यांनी लिहिले: "बिहारने एनडीएला ऐतिहासिक जनादेश दिला आहे. आता अनेक जण ईव्हीएमवर खापर फोडतील. पराभवाची नवनवीन कारणे शोधतील."
प्रमुख एक्झिट पोलचे आकडे
विविध सर्वे एजन्सींनी जाहीर केलेले आकडे खालीलप्रमाणे आहेत:
1. दैनिक भास्कर एक्झिट पोल (Dainik Bhaskar Exit Poll)
एनडीए (NDA): 145-160 (बंपर बहुमत)
महागठबंधन (Mahagathbandhan): 73-91
जन सुराज (Jan Suraaj): 0- 3
( नक्की वाचा : Bihar Election : तेजस्वींच्या 'गडा'त 2 'शत्रू' घुसले! 24 जागांच्या गणिताने बिहारच्या राजकारणाची दिशा बदलणार? )
2. मॅट्रिझ (Matrize) एक्झिट पोल
सर्वे एजन्सी मॅट्रिझच्या आकडेवारीनुसार, एनडीएला मोठं मतदान झाल्याचं दिसत आहे.
एनडीए (NDA): 147-167 (48 टक्के मत मिळण्याची शक्यता)
जेडीयू (JDU): 67-75
भाजप (BJP): जेडीयूच्या जवळपास इतक्याच जागा मिळण्याची शक्यता. (विशेष म्हणजे या एक्झिट पोलमध्ये जदयू भाजपपेक्षा मोठी पार्टी बनू शकते, असे अनुमान आहे. गेल्यावेळी जदयूने 43 जागा जिंकल्या होत्या. यावेळी दोन्ही पक्षांनी 101-101 जागांवर निवडणूक लढवली.)
महागठबंधन (Mahagathbandhan): 70-90 जागा (37 टक्के मत मिळण्याची शक्यता)
जन सुराज (Prashant Kishor's Jan Suraaj): 0-2 जागा (5 टक्के मत मिळण्याची शक्यता)
एआयएमआयएम (AIMIM - Owaisi's Party): 2-3 जागा (1 टक्के मत मिळण्याची शक्यता)
अन्य (Others): 0-5 जागा (9 टक्के मत मिळण्याची शक्यता)
3. पीपुल्स प्लस (Peoples Plus) एक्झिट पोल
या एजन्सीनेही एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असा दावा केला आहे.
एनडीए (NDA): 133-159
महागठबंधन (Mahagathbandhan): 75-101
जन सुराज (Jan Suraaj): 0-5
अन्य (Others): 2-8
बहुतेक एक्झिट पोलचे आकडे एनडीएला 122 चा बहुमताचा आकडा सहज पार करताना दाखवत आहेत. आता 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलचे अंदाज सत्यात उतरतात का, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world