संजय तिवारी, प्रतिनिधी
Who Is Shivani Dani : राज्यातील 29 महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आज महापौरपदासाठीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. त्यामुळे महापौरपदावर विराजमान होण्यासाठी अनेक उमेदवारांची रस्सीखेंच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूर महानगरपालिकेची राज्यभरात चर्चा आहे. याठिकाणी महापौर आरक्षण सर्वसाधारण महिला असल्याने महापौरपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच भाजप नगरसेविका शिवानी दाणी यांची जोरदार चर्चा रंगली आहे. नागपुरात भारतीय जनता पक्षाचा 'युवा आवाज' म्हणून त्यांना ओळखलं जातं. शिवानी दाणी नागपूर महानगरपालिका निवडणुकीत मोठ्या फरकाने जिंकल्या आहेत.
शिवानी दाणी या फडणवीसांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांपैकी एक आहेत.तसच त्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्या असून त्या सरचिटणी पदावरही कार्यरत आहेत.राजकारणाच्या पलीकडेही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्या एक उत्कृष्ट वक्त्या आणि अभ्यासू वृत्ती असलेल्या महिल्या नेत्या आहेत.त्या अनेक राजकीय कार्यक्रमांमध्येही सहभागी होतात. आज गुरुवारी 22 जानेवारीला मुंबई येथे महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत पार पडताच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं. शिवानी दाणी या भाजपच्या महापौरपदाच्या उमेदवार असतील, असा दावा त्यांनी केला आहे.
नक्की वाचा >> Navi Mumbai Mayor : नवी मुंबईला मिळणार महिला महापौर, 'या' नगरसेविकेच्या गळ्यात पडणार महापौरपदाची माळ?
कोण आहेत शिवानी दाणी ?
भारतीय जनता पक्षात युवा पिढीकडे नेतृत्व सोपविण्याचे वारे वाहत आहेत. तरुण नेते म्हणून निती नवीन यांची भाजपच्या राष्ट्रीय अक्ष्यक्षपदी वर्णी लागली आहे. अशातच आता नागपूरच्या महापौरपदाबाबत राजकीय वर्तुळात तुफान चर्चा आहे. शिवानी दाणी नेमक्या कोण आहेत?असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. जवळपास 30 वर्षांच्या शिवानी वाणी महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालयासाठी विदर्भ क्षेत्राच्या गुंतवणूक सल्लागार आहेत.
दाणी या माध्यमातून विदर्भातील एमआयडीसी क्षेत्र आणि मिहान येथील औद्योगिक गुंतवणुकीविषयी समन्वय राखण्याची आणि आवश्यक उपाययोजना सूचविण्याची जबाबदारी त्यांचेकडे आहे. त्यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत जोडलेलं आहे. शिवानी स्वत: स्वयंसेविका असून लहानपणापासून त्या राष्ट्र सेविका समितीच्या शाखेत जायच्या. त्यांनी संगणक विषयात पदवी मिळवली आहे. तसच त्या गुंतवणूक क्षेत्रात मध्य भारतातील महत्त्वाचे नाव असलेल्या मनी बी नामक संस्थेच्या संस्थापिका आणि संचालिका आहेत. याद्वारे त्या आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूक प्रशिक्षण विषयक मार्गदर्शन करतात.
नक्की वाचा >> Sangli News: संगीतकार पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ, सांगली पोलीस अधीक्षकांकडे तक्रार, नेमकं प्रकरण काय?
शिवानी दाणी यांच्याविषयी महत्त्वाची माहिती
- शिक्षण - Bsc कॉम्प्युटर सायन्स
- दक्षिण पश्चिम मतदार संघातून प्रभाग 36 मधून नगरसेवक ( देवेंद्र फडणवीस यांचा विधानसभा क्षेत्र) भाजपच्या सर्वाधिक मत प्राप्त केलेल्या नगरसेवकांपैकी एक
- राष्ट्रीय सेविका समितीत कामाला सुरुवात
- अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत काम
- नागपूर शहर यूवा मोर्चा शहराध्यक्ष म्हणून दोन टर्म काम, प्रदेशात महामंत्री म्हणून जवाबदारी
- अर्थ सल्लागार
- मनी बी इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आर्थिक साक्षरता विषयावर अनेक ठिकाणी व्याख्यान, अर्थ संकल्पाचे विश्लेषण
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विदर्भ औद्योगिक सल्लागार म्हणून कामाचा अनुभव