शरद सातपुते, प्रतिनिधी
Palash Muchhal latest News : भारताची स्टार फलंदाज स्मृती मंधानासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. पलाश मागील काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर फार सक्रीय नव्हता. पलाशला वैयक्तिक जीवनात मोठ्या संकटाला सामोरं जावं लागल्यानंतर आता तो पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. विज्ञान माने नावाच्या तरुणाने त्याच्या विरोधात सांगलीच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार नोंदवली आहे. 'नजरिया' या चित्रपटात काम देतो आणि चित्रपटाचा प्रोड्युसर म्हणून गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवल्याचा आरोप पलाशवर करण्यात आला आहे. विज्ञानने याबाबत तक्रार दाखल केली असून अद्यापही गुन्हा दाखल करण्यात आला नाहीय.
40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, संगीतकार पलाश मुच्छलच्या विरोधात सांगली येथील विज्ञान माने या तरुणाने आर्थिक फसवणुकीची तक्रार सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक याच्यांकडे केली आहे. सांगली मधील विज्ञान माने या फिल्म इंडस्ट्रीमध्ये अॅक्टिंगचं काम करणाऱ्या तरुणाने संगीतकार पलाश मुच्छल विरोधात एकूण 40 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार केली आहे. नजरिया' या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून या चित्रपटाचा प्रोड्युसर म्हणुन त्यामध्ये गुंतवणूक करावी,असं आमिष पलाशने दाखव्याचा आरोप करण्यात आला आहे. तसच चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून 25 लाख गुंतवणुकीवर 12 लाख रुपयापर्यंत मोबदला मिळणार असल्याचंही पलाशने विज्ञान मानेला सांगितलं होतं.
नक्की वाचा >> Navi Mumbai Mayor : नवी मुंबईला मिळणार महिला महापौर, 'या' नगरसेविकेच्या गळ्यात पडणार महापौरपदाची माळ?
पलाश मुच्छलविरोधात गुन्हा दाखल नाही
पलाश चित्रपटात अॅक्टिगचं कामही देणार होता, असंही विज्ञान माने या तरुणाने तक्रारीत म्हटलं आहे. पलाशने मला विश्वासात घेऊन माझ्याकडून वेळोवेळी एकूण 40 लाख रुपये घेऊन माझा विश्वासघात करत आर्थिक फसवणूक केली, असाही मानेनं तक्रारीत केला आहे. आर्थिक फसवणूक केल्याबाबत पलाश मुच्छलवर विरोधात पोलीस अधिक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला नसल्याची माहिती समोर आली आहे.
नक्की वाचा >> ट्रेनमध्ये रात्रीच्या वेळी 5 मुलींच्या गप्पा रंगल्या..बाजूला बसलेल्या प्रवाशाची नियत फिरली, घाणेरड्या नजरेनं..
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world