मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं सर्वच राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. अशा वेळी सत्तेत असलेले भाजपचे आमदार या प्रकरणी खुले पणाने बोलत आहे. बीडमध्ये दडपशाही आहे असं थेट वक्तव्य भाजप आमदार सुरेश धस यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने त्यांनी आपल्या सरकारलाच घरचा आहेर दिला आहे. ते यावरच थांबले नाहीत. त्यांनी बीडमध्ये काय-काय सुरू आहे याची थरारक माहितीच त्यांनी यावेळी दिली. शिवाय संतोष देशमुख हत्ये प्रकरणात मी आता थेट नाव घेणार नाही, पण ज्या वेळी चौकशी होईल त्यावेळी सर्व काही समोर येईल असं सुचक वक्तव्यही त्यांनी केलं. तर राष्ट्रवादीचे आमदार संदिप क्षिरसागर यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराड याच्याकडे बोट दाखवले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सुरेश धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. ते भाजपच्या तिकीटावर निवडून आले आहेत. सध्या राज्यात भाजप प्रणित महायुतीचे सरकार आहे. अशा वेळी धस यांनी आपल्याच सरकार विरोधात भूमीका घेतली आहे. त्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये सुरू असलेल्या दडपशाहीबाबत भाष्य केलं आहे. बीडमध्ये सध्या भीषण दडपशाही सुरू आहे. संतोष देशमुख हत्येची चौकशी करण्यासाठी एसआयटी चौकशीची मागणी आपण केली असल्याचे सुरेश धस यांनी म्हटले आहे.
आपण त्याबाबत मागणी केली आहे. सरकारी प्रक्रिया असल्याने थोडा वेळ लागेल. पण एसआयटी चौकशी होईल असं ही ते म्हणाले. या हत्ये प्रकरणात आका आणि आकाचा आका यांची चौकशी झाली पाहीजे ही वारंवार मागणी करत आहे. मी आतापर्यंत या प्रकरणात कुणाचेही नाव घेतलेले नाही. जोपर्यंत चौकशी पुर्ण होत नाही तोपर्यंत नाव घेणार नाही असंही ते म्हणाले. त्यासाठी चौकशी गरजेची आहे. या प्रकरणातील आरोपींचे कॉल डिटेल्स तपासा. आताचे तपासा आणि एक महिना आधीचेही तपासा. त्यातून कोण कोणाच्या संपर्कात होते. कट कसा शिजला यासर्व गोष्टी स्पष्ट होतील असंही धस म्हणाले. कॉल डिटेल्स तपासल्यानंतर सर्व काही समोर येईल असंही त्यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - 'हिंमत असेल तर राजीनामा देऊन दाखवा' भुजबळांना भिडणारा नेता कोण?
त्याही पुढे जात धस यांनी आणखी काही गंभीर गोष्टी सांगितल्या आहे. हे कृत्य ज्या लोकांनी केले आहे, ते गुंड प्रवृत्तीचे आहेत. त्यांची या परिसरात प्रचंड दहशत आहे. या परिसरात एकदा जाऊन बघा. तिथे तुम्हाला त्यांचीच दहशत दिसेल. त्यांनी आजूबाजूच्या गावातल्या किती लोकांचे हात पाय तोडले. किती लोकांना मारलं आहे. यापेक्षा ही गंभीर म्हणजे या परिसरातल्या किती मुलीबाळींवर वक्र दृष्टी टाकली आहे हे समजेल असं धक्कादायक विधानही धस यांनी केलं आहे. संतोष देशमुख हे तर शेवटचं टोक आहे. बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत असंही ते म्हणाले. त्यांनी अंगावर काटा आणणारे अनेक गुन्हे केले आहेत असंही ते म्हणाले.
दरम्यान या हत्ये प्रकरणी वाल्मिक कराड याच्या विरोधात खुनाचा गुन्हा अजून दाखल का करण्यात आला नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार संदिप क्षिरसागर यांनी सांगितले. त्याच्या विरोधात केवळ खंडणीचा गुन्हा दाखल आहे. त्या गुन्हेगाराची सीडीआर तपासावेत अशी मागणी ही त्यांनी केली आहे. जर हे तपासले तर दोन मिनिटात सर्व प्रकरणाचा छडा लागेल असंही ते म्हणाले. ठारावीक एक दोन लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम झाला आहे. या दोन तीन लोकांना सरळ केलं तर संपुर्ण जिल्हा सरळ होईल असंही ते म्हणाले. ज्याने कट रचला त्याला अटक झाली पाहीजे असं त्यांनी सांगितलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world