BMC Election 2026 : ठाकरेंच्या सभेला महापालिकेची परवानगी, मुंबईतील ठिकाण अन् तारीख ठरली, पण 'या' 24 अटी..

ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला मुंबई महानगरपालिकेनं परवानगी देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती वाचा..

जाहिरात
Read Time: 3 mins
Thackeray Sabha In Mumbai News
मुंबई:

Shivsena-MNS Sabha In Mumbai : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार राजकीय संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने विरोधकांपुढे ही निवडणूक जिंकण्याचं मोठं आव्हान असणार आहे. जागावाटपावरून मनसेच्या काही पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत भाजपात जाण्याचे संकेत दिले आहेत. तर ठाकरेंचे काही कार्यकर्तेही जागावाटपावरून नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच मुंबई महानगरपालिकेनं ठाकरेंच्या शिवाजी पार्क येथील सभेला परवानगी दिली आहे. येत्या 11 जानेवारीला (रविवारी) दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. परंतु, महापालिकेकडून या सभेसाठी तब्बल 24 अटींचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वाचा सविस्तर माहिती.

या 24 अटींचे पालन करणे अनिवार्य

  • अर्जदारास मा. उच्च न्यायालयाने Notice Of Motion No.666 Of 2015 अन्वये घातलेल्या अटी व शर्थीचे पालन करावे लागेल.
  • मा. उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्र. 173/2010 व त्याअनुषंगाने पारित केलेल्या अटींचे पालन करावे लागेल. 
  • या दिवशी सदर ठिकाणी शासनाने किंवा महानपालिकेने कोणताही कार्यक्रम आयोजित केल्यास अथवा आपात्कालीन परिस्थिती उदभवल्यास आपणांस कोणतीही पूर्व सुचना न देता आपली परवानगी रद्द करण्यात येईल.
  • रात्री 10.00 नंतर कोणत्याही प्रकारच्या सभेस / कार्यक्रमास परवानगी नाही याची नोंद घ्यावी.
  • कार्यक्रम संपल्यावर मैदान पूर्ववत स्थितीत करून द्यावे लागेल.
  • मा. उच्च न्यायालयाच्या / शासनाच्या तसेच महानगरपालिकेच्या सर्व अटी / शर्तीचे काटेकोरपणे पालन केले जाईल याबाबतचे हमीपत्र स्टॅम्प पेपरवर सादर करावे लागेल.
  • अर्जदारास सदर ठिकाणी शासन निर्णयानुसार इतर कार्यक्रम आयोजित असल्यास कोणतीही बाधा निर्माण होणार याची जबाबदारी घ्यावी लागेल.
  • कार्यक्रमाच्या संयोजकांनी घन कचरा व्यवस्थापन विभागाचे टी.आर.सी. शुल्क भरावे.

नक्की वाचा >> Election 2026 : 'निवडणुकीच्या कामकाजात हलगर्जीपणा केला, तर...', राज्य निवडणूक आयुक्तांचे महत्त्वाचे निर्देश

  • कार्यक्रमाच्या संयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वतःचे ओला व सुका कच-याचे डबे ठेवावेत.
  • कार्यक्रमाच्या संयोजकांनी काळ्या पिशवीमध्ये कचरा भरून ठेवण्याची व्यवस्था करावी त्यानंतर म.न.पा.कडून देण्यात येणा-या गाडीवर कचरा गोळा केला जाईल.
  • जर कार्यक्रमाच्या ठिकाणी कचरा अस्ताव्यस्त अवस्थेत पडून असेल किंवा स्वच्छता नसेल तर कार्यक्रमाच्या संयोजकांकडून महापालिकेकडे भरलेल्या अनामत रकमेतून कार्यक्रमाच्या संयोजकास दंड आकारणी करण्यात येईल. 
  • मैदानाचे कोणतेही नुकसान/गैरवापर/अटींचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यास आपण भरलेली अनामत रक्कम 20000 रुपये जप्त करण्यात येईल. याची नोंद घ्यावी. 

नक्की वाचा >> "त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने...", रवींद्र चव्हाण-विलासराव प्रकरणावर CM फडणवीसांची सारवासारव, म्हणाले..

  • आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक 2026 अंतर्गत आदर्श आचारसंहिता लागू असल्याने स्थानिक मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांची ना-हरकत घेणे बंधनकारक राहील.
  • महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या क्र.एमपीसीबी/जीडी (एपीसी)/टीबी/बी-०२९७ दि. 20.03.2024 अन्वये आपणास कोणत्याही प्रकारची माती छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानात टाकता येणार नाही, याची नोंद घेण्यात यावी असे निर्देश जी उत्तरचे सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी दिली आहे.