महायुती सरकारमधील खातेवाटप पूर्ण होऊन मंत्रिपदाच्या शपथविधीला 17 दिवस उलटल्यानंतरही अद्याप 18 मंत्र्यांनी आपला पदभार स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील 15 कॅबिनेट आणि 5 राज्यमंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याची माहिती समोर आली आहे. आवडीची खाती न मिळणे त्याशिवाय बंगला न आवडल्याने अनेकांनी अद्याप पदभार स्वीकारला नसल्याचं समोर आलं आहे.
नक्की वाचा - Deepak Kesarkar:'विद्यार्थ्यांना मराठी वाचता येत नाही', माजी शिक्षण मंत्री म्हणतात त्याला तर...
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच पदभार न स्वीकारलेल्या मंत्र्यांना आदेश जारी केले आहेत. ज्यांनी पदभार स्वीकारलेला नाही त्यांनी त्वरित पदभार स्वीकारा. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री यांनी बंगले आणि फ्लॅटवरुन नाराजी व्यक्त केली होती. त्यावर सीएम फडणवीस यांनी नाराजी नको तत्काळ फ्लॅट ही ताब्यात घ्यावे आणि कामाला सुरुवात करावी असा आदेश दिला आहे.
नक्की वाचा - Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन आरोपी अद्यापही फरार, शोध सुरू
महायुतीतील डझनभर मंत्र्यांनी अद्यापही पदभार स्वीकारला नसल्याने आता मुख्यमंत्र्यांनी आमदारांना लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. अनेक आमदारांना दिलेले फ्लॅट आणि बंगले पसंत पडलेले नाहीत. मात्र आता देण्यात आलेल्या फ्लॅट आणि बंगल्यात राहा. येत्या वर्षात काही मंत्र्यांना नव्या जागी मोठे फ्लॅट देण्याचा विचार सुरू असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नाराज मंत्र्यांना सांगितल्याची माहिती आहे.
आतापर्यंत पदभार न स्वीकारलेले शिवसेनेचे मंत्री
एकनाथ शिंदे
उदय सामंत
भरत गोगावले
गुलाबराव पाटील
प्रकाश आबिटकर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world