जाहिरात

केंद्रीय मंत्र्यांच्या आई आणि काकूमध्ये झालं जोरदार भांडण, घरातून काढलं बाहेर, टाळं ठोकलं!

Chirag Paswan family row: दिवगंत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या कुटुंबातील संघर्ष पुुन्हा एकदा उफाळून आला आहे.

केंद्रीय मंत्र्यांच्या आई आणि काकूमध्ये झालं जोरदार भांडण, घरातून काढलं बाहेर, टाळं ठोकलं!
मुंबई:

Chirag Paswan family row: दिवगंत केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या कुटुंबातील संघर्ष पुुन्हा एकदा उफाळून आला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्यात राजकीय संघर्ष सुरु आहे. त्यातच आता कौटुंबीक संपत्तीचा वाद समोर आला आहे. 

चिराग पासवान यांची मोठी आई आणि रामविलास पासवास यांच्या पत्नी राजकुमारी देवी यांनी आपल्या खोलीला कुलुप लावल्याचा आरोप केला आहे. त्यांनी रामविलास पासवान यांचे भाऊ पशुपती कुमार पारस आणि रामचंद्र पासवान यांच्या पत्नीवर घरातून बाहेर काढल्याचा आरोप केला आहे. हे प्रकरण चिराग पासवान यांच्याकडं गेलं आहे. त्यांनी पक्षाचे मुख्य सरचिटणीस आणि भाचे प्रिन्स मृणाल यांना त्याठिकाणी पाठवलं आहे. अर्थात या प्रकरणात कुणीही अद्याप पोलिसांमध्ये तक्रार केलेली नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

रामविलास पासवान यांनी केलं होतं दुसरं लग्न

रामविलास पासवान यांनी दोन लग्न केले होते. त्यांचं पहिलं लग्न राजकुमारी देवींबरोबर झाले होतं. तर दुसरं लग्न रिना शर्मा यांच्याबरोबर केलं. शहरबन्नी यांच्या घरातील काही खोल्यांवर पशुपती कुमार पारस यांच्या कुटुंबीयांनी मालकी हक्क सांगत कुलुप लावलं. त्यानंतर राजकुमारी देवी नाराज संतप्त झाल्या आहेत. या लोकांनी आमच्याकडून सर्व शेत घेतलं. आम्ही एक शब्दही बोललो नाही. आता आम्हाला विभागणी हवी आहे. माझा हक्क जितका आहे तितकं मला द्यावं.

( नक्की वाचा : UPS : 1 एप्रिलपासून लागू होणार नवी पेन्शन योजना! वाचा सरकारी कर्मचाऱ्यांचा काय होणार फायदा? )
 

पक्षाचे सरचिटणीस संजय पासवान यांनीही या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आहे. पारस त्यांचे भाऊ रामविलास यांना देव म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या वहिनींना बेघर केलं आहे. हे दुर्दैवी आहे. ते बिहार जोडण्याच्या गोष्टी करतात. पण, जे स्वत:च्या वहिनीचा आदर करत नाहीत ते दुसऱ्यांना एकत्र कसे आणणार? असं प्रश्न त्यांनी विचारला. 

यापूर्वी रामविलास पासवान यांच्या निधनानंतर त्यांचे भाऊ पशुपती पारस आणि चिराग पासवान यांच्यात पक्षातील विभागणीवरुन वाद झाला होता. पशुुपती यांनी पक्षाच्या सर्व खासदारांना आपल्या गटात ओढलं होतं. पण, चिराग पासवान यांनी दमदार पुनरागमन केलं त्यांनी राजकारणात महत्त्वाची जागा मिळवली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: