
बिहारमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमुळे सध्या राज्यातील राजकारण तापले आहे. एनडीए (NDA) आणि महागठबंधनमधील (Mahagathbandhan) राजकीय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरू झाली आहे. सर्वच पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यासाठी दबावतंत्राचाही वापर केला जात आहे. याच संदर्भात, रविवारी लोजपा (रामविलास) पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी छपरा येथे आयोजित एका जाहीर सभेत मोठी घोषणा केली. बिहार विधानसभेच्या सर्व 243 जागा आपण लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी स्वतःच स्पष्ट केले की, एनडीएचा भाग म्हणूनच ते सर्व जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) मधील लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चे प्रमुख आणि केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी रविवारी सांगितले की, जेव्हा ते बिहारमध्ये येऊन निवडणूक लढवण्याबद्दल बोलतात, तेव्हा अनेकांना त्रास होतो. त्यांना विचारले जाते की किती जागांवर निवडणूक लढवणार? अशा परिस्थितीत आज मी घोषणा करतो की, बिहारमधील सर्व 243 जागांवर निवडणूक लढवेन असं चिराग पासवान म्हणाले होते. त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय समिकरण कशी बदलणार याची चर्चा बिहारमध्ये रंगली होती.
चिराग यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी आत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की आपण एनडीएचाच भाग राहणार आहोत. ते म्हणाले की, प्रत्येक जागेवर चिराग पासवान उभा राहील. यावेळी पासवान यांनी कोणाचेही नाव न घेता सांगितले की, त्यांना बिहारमध्ये येण्यापासून रोखण्याचा कट रचला जात आहे. पण त्यांनी स्पष्ट केले की, ते कोणालाही घाबरणार नाहीत. बिहारच्या राजकारणातील अभ्यासकांचे म्हणणे आहे की, चिराग जाणीवपूर्वक हे विधान वारंवार करत आहेत. वास्तविक, यामागे एनडीएमध्ये जास्तीत जास्त जागा मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. याच कारणामुळे चिराग एक प्रकारचा सस्पेन्स निर्माण करत आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Nagpur Underworld Story: डॉनच्याच बायकोवर प्रेम! मग अफेअर, अपघात अन् संशय
चिराग पासवान यांनी आपल्या कार्यकर्त्यां समोर बोलताना सांगितले की "आज सारणच्या या पवित्र भूमीतून, तुमच्या सर्वांसमोर मी हे सांगून जात आहे की, होय, मी निवडणूक लढवेन. मी बिहारच्या लोकांसाठी, माझ्या बांधवांसाठी, माझ्या मातांसाठी, माझ्या बहिणींसाठी निवडणूक लढवेन आणि बिहारमध्ये अशी व्यवस्था तयार करेन, असा बिहार बनवेन, जो खऱ्या अर्थाने राज्याला विकासाच्या मार्गावर पुढे घेऊन जाईल." असं ते म्हणाले. 'बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट' साठी आपला जीव पणाला लावेन असं ही ते म्हणाले. आरक्षणाबाबत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, ही अफवा पसरवली जात आहे की आरक्षण संपवले जाईल, परंतु रामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान जिवंत असेपर्यंत जगातील कोणतीही शक्ती आरक्षण संपवू शकत नाही.
त्यांनी विरोधकांना लक्ष्य करत सांगितले की, जे लोक आज बिहारमध्ये विकासाची चर्चा करत आहेत, तेच विरोधक आहेत ज्यांनी 90 च्या दशकात बिहारला उद्ध्वस्त केले होते. त्यांनी जोर देऊन सांगितले की, आम्हाला बिहारमध्ये असे सरकार हवे आहे, जे बिहारमधून बाहेर जाणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी, त्यांच्या शहरात, त्यांच्या तालुक्यात रोजगार देऊ शकेल. येथील लोकांना कमावण्यासाठी बाहेर जावे लागू नये. असं स्पष्ट करत तरुणांना आणि बेरोजगारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world