Bhayandar News: प्रताप सरनाईक फाउंडेशन क्रिकेट स्पर्धेत तुफान राडा,  भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झाला वाद

भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानावर प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या क्रिकेट स्पर्धेला मोठं गालबोट लागल्याची घटना घडली.  

जाहिरात
Read Time: 2 mins
Bhayandar Cricket Tournament Political Clash
मुंबई:

रमेश शर्मा, प्रतिनिधी 

Bhayandar Cricket Tournament News : भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र बोस मैदानावर प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. परंतु, या क्रिकेट स्पर्धेला मोठं गालबोट लागल्याची घटना घडली. भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी गुरुजोत सिंह यांनी आमदार नरेंद्र मेहता यांच्याविरोधात अभद्र व शिवराळ भाषा वापरली होती, असा आरोप त्यांच्यावर होता. या क्रिकेट स्पर्धेच्या कार्यक्रमाला  उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांना मिळाली. त्यानंतर मैदानात मोठा राडा झाला. कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या वादविवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलं

यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पोस्टर्सवर लक्ष्य करत काळी शाई फेकली तसेच चप्पलही फेकून निषेध व्यक्त केला. या घटनेदरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आले,ज्यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान,या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले.

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : पुणे जिल्ह्यात खळबळ! जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा मृत्यू, अपघात की घातपात?

शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी संतोष गोळे यांनी म्हटलंय की,"आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्ताने क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे हे आमच्यासाठी नाही मिरा भाईंदर शहरासाठी अभिमानाची बाब आहे.युवासेनेचे पदाधिकारी सरदार गुरुजोत सिंह यांनी आमदार नरेंद्र मेहता बद्दल काही बोलले असतील. त्यांच्यावर नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.पोलिस चौकशी करत आहेत. असं इथे येऊन आंदोलन करणं योग्य नाही"."आमच्या आमदार नरेंद्र मेहता बद्दल अभद्र भाषेत बोलणं आम्ही सहन करणार नाही",अशी प्रतिक्रिया भाजप नगरसेवक विशाल पाटील यांनी दिली आहे.

नक्की वाचा >> RR vs SRH : दिग्गजांना संपूर्ण करिअरमध्ये एकदाही जमलं नाही, 'तो' कारनामा वैभव सूर्यवंशीने 3 वेळा केला