CM Devendra Fadnavis Nashik Speech : "मी श्रीराम प्रभुंना वंदन करतोय.पण काल परवा दोन भाऊ येऊन गेले.नाशिकमध्ये आले पण रामाची आठवणच झाली नाही. नाशिकमध्ये येऊन ज्यांनी राम मांडला नाही.आता त्यांच्यात राम उरला नाही. जो रामाचा नाही,तो कोणत्याही कामाचा नाही.अलीकडच्या काळात काही लोक म्हणायला लागले, देव खरंच आहेत की नाही?असा प्रश्न काही लोकांना पडला. देवाची खिल्ली काही लोक उडवायला लागले. त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणार नाही. या नाशिक शहरात खऱ्या अर्थाने जो काही विकास झाला आणि जो काही विकास होणार आहे. त्याची क्षमता जर कोणामध्ये असेल, तर ती भारतीय जनता पक्षामध्ये आहे,असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते नाशिकच्या प्रचारसभेत बोलत होते.
"माझी खिल्ली उडवली गेली. नाशिक दत्तक घेतलं होतं त्याचं काय झालं, असं म्हणाले.मी नाशिक दत्तक घेतोय, असं मी सांगितलं होतं.मी त्यानंतर ही तक्रार नाही केली की मी नाशिक दत्तक घेतलं..2017 साली, 2019 साली विरोधी पक्षाचा नेता झालो.दोनच वर्ष मला मिळाले. पण याची तक्रार मी केली नाही", असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा समाचार घेतला.
नक्की वाचा >>NDTV Power Play Conclave : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! "कोस्टल रोडला टोल नसणार", राहुल शेवाळेंचं मोठं विधान!
"आम्ही तक्रार करणारे लोक नाहीत"
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, "तक्रार करणारे लोकं आम्ही नाही आहोत.जेव्हा कोविडचा काळ होता,तेव्हा हे सगळे उबाठाचे, मनसेचे, काँग्रेसचे,राष्ट्रवादीचे नेते घरी बसले होते, त्यावेळी या नाशिकमध्ये हा देवाभाऊ आला होता. या ठिकाणच्या प्रत्येक कोविड केअर सेंटरमध्ये आणि आयसीयुपर्यंत जाणारा हा देवाभाऊ होता.पण मला तुम्हाला विचारायचंय,तुम्ही कितीवेळा नाशिकला आले? मी तर वर्षातून चारदा नाशिकला येतो.निवडणुका आल्या की नाशिकला यायचं आणि निवडणुका संपल्या की नाशिकला विसरायचं..अशा पद्धतीनं हे जे निवडणूक पर्यटक आहेत, निवडणुकीच्या निमित्ताने हे पर्यटन करणारे लोक आहेत.
नक्की वाचा >> NDTV Conclave 2026 : मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर? आशिष शेलारांनी एका शब्दातच विषय संपवला!
"सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने देईल"
आजही मी तुम्हाला सांगतो, नाशिकशी माझं नातं तेच आहे.कालही होतं..आजही आहे आणि उद्याही राहील.या नाशिकची जबाबदारी मी घेतली आहे. नाशिककरांनी तुम्हालाही सत्ता दिली होती. त्यावेळी तुम्ही काहीच केलं नाही. ज्यावेळी कुंभमेळ्याची वेळ आली, त्यावेळी यांनी हात वर केले. काही करता येणार नाही म्हणून सांगितलं.आमच्याकडे वेळ कमी होता. 2015 च्या कुंभमेळ्यात यांनी सांगितलं महानगरपालिका एक पैसा देणार नाही. काही हरकत नाही. सगळा पैसा राज्य सरकारच्या वतीने देईल. सगळा पैसा त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने दिला आणि कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला.