मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगामी राजकीय समीकरणांवर मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची पहिलीच जाहीर मुलाखत नागपूरमध्ये झाली. या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली. फडणवीस सरकार तिसऱ्यांदा मोठ्या बहुमतासह सत्तेत आलं आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा एकदा नवी समीकरण पाहायला मिळणार अशी चर्चा सुरु आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर फडणवीस यांनी राजकारणात काहीही होऊ शकतं, असं मोठं वक्तव्य केलं. फडणवीस यांनी हे वक्तव्य करताच त्याचा अर्थ काय? ही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाले मुख्यमंत्री?
राज्याच्या राजकारणातील भावी समीकरणावरील प्रश्नावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, '2019 ते 2024 पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यामधून मला एक गोष्ट लक्षात आली की, कोणतीही गोष्ट होणार नाही असं समजून चालायचंच नाही. काहीही होऊ शकतं, असं व्हावं असं बिलकूल नाही. उद्धव ठाकरे तिकडे जातात, अजित पवार इकडे येतात. राजकारणात काहीही होऊ शकतं, असं व्हावं असं बिलकूल नाही.ते होणं फार चांगलं आहे या मताचा मी नाही. राजकारणात हे लक्षात ठेवलं पाहिजे की खूप ठामपणे असं होणार नाही, असं मी म्हणतो त्यावेळी राजकीय परिस्थिती कुठं नेऊन ठेवेल याचा भरवसा नाही,' असं सूचक वक्तव्य केलं.
( नक्की वाचा : PM Modi First Podcast : 'मी देवता नाही, माझ्याकडूनही चुका होतात', मोदींनी सांगितली 'मन की बात' )
शरद पवारांनी संघाची प्रशंसा का केली?
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विधानसभा निवडणुकीत केलेल्या कामाची प्रशंसा केली. फडणवीस यांनी शरद पवारांनी केलेल्या प्रशंसेचा अर्थ सांगितला.
शरद पवार अतिशय चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांनी नक्की याचा विचार केला असेल. आम्ही तयार केलेलं वायू मंडल एका मिनिटात पंक्चर झालं. हे करणारी शक्ती कोण? त्यांच्या लक्षात आलं की शक्ती नियमित राजकारण करणारी शक्ती नाही. ही राष्ट्रकारण करणारी शक्ती आहे. शेवटी प्रतिस्पर्ध्याचंही कधीतरी कौतुक करावं लागतं. त्यांनी तसं कौतुक केलं, असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.