CM Devendra Fadnavis Press Conference : उद्या सोमवार पासून सुरु होणाऱ्या हिवाळी अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. नागपूर येथे सात दिवसीय हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. तत्पूर्वी विरोधकांनी या अधिवेशनवार चहापानाचा बहिष्कार टाकलाय. अशातच फडणवीसांनी पत्रकार परिषदेत मोठं विधान केलं आहे.
यावेळी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले,"आज विरोधी पक्षाची जी पत्रकार परिषद झाली, ती अतिशय निराशेनं भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली. त्या पत्रकार परिषदेत अनेक गंमती झाल्या. भास्कराव म्हणाले, काँग्रेस इमानदार आणि सुसंस्कृत होती. त्यांना वस्तुस्थिती काय आहे, हे माहित आहे. पत्रावर सह्या करायलाच कोणी मिळालं नाही. त्यामुळे दोन तास उशिरा आमच्याकडे पत्र आलं. शरद पवार गटाच्या कोणाचीच सही त्यावर नाही. त्याचा वेगळा अर्थ मी काही काढणार नाही. पण हे मात्र नक्की आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
नक्की वाचा >> कल्याण-डोंबिवलीत महायुतीत वादाची ठिणगी? 'या' पदाधिकाऱ्याच्या पक्ष प्रवेशाला रविंद्र चव्हाणांनी दिली स्थगिती
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
"उद्यापासून सुरु होणाऱ्या राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडली आहे. त्याआधी चहापानाचा कार्यक्रम होता. विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय. त्यामुळे आम्हालाच आमचा आमचा चहा प्यावा लागला.आज विरोधी पक्षाची जी पत्रकार परिषद झाली, ती अतिशय निराशेनं भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली.
त्या पत्रकार परिषदेत अनेक गंमती झाल्या. भास्कराव म्हणाले, काँग्रेस इमानदार आणि सुसंस्कृत होती. त्यांना वस्तुस्थिती काय आहे, हे माहित आहे. पत्रावर सह्या करायलाच कोणी मिळालं नाही. त्यामुळे दोन तास उशिरा आमच्याकडे पत्र आलं. शरद पवार गटाच्या कोणाचीच सही त्यावर नाही. त्याचा वेगळा अर्थ मी काही काढणार नाही. पण हे मात्र नक्की आहे", असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.