राजापूर कोणाचे? जागा ठाकरेंची पण 'त्या'एका निकषावर काँग्रेसचे बोट

ज्याचा आमदार त्याची ती जागा असे धोरण महाविकास आघाडीचे ठरले आहे. त्यानुसार राजापूर मतदार संघ हा शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात पडेल अशी स्थिती आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
रत्नागिरी:

राकेश गुडेकर 

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागा वाटप दसऱ्यापर्यंत पूर्ण होईल असे सांगितले जात आहे. जवळपास सर्व जागांवर सहमती झाल्याचे मविआचे नेते सांगत आहेत. असं असलं तरी स्थानिक पातळीवर जागा आपल्यालाच मिळणार म्हणून इच्छुक उमेदवार हे आशावादी आहेत. राजापूर विधानसभा मतदार संघात हेच चित्र पाहायला मिळत आहे. या मतदार संघात नेहमीच काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी चुरशीची लढत झाली आहे. सध्या या मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन साळवी हे आमदार आहे. असं असताना काँग्रेसने या मतदार संघावर दावा केला आहे. शिवाय हा मतदार संघ काँग्रेसला का मिळाला पाहीजे याबाबत युक्तीवादही केला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

राजापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे राजन साळवी हे विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसच्या अविनाश लाड यांचा पराभव केला होता. ही लढत चुरशीची झाली होती. त्यानंतर राजकीय स्थिती बदलली. राज्यात युती ऐवजी महाविकास आघाडीचे सरकार आले. ते सरकार पडले. शिवसेनेत फुट पडली. राजन साळवी यांनी ठाकरेंची साथ दिली. ठाकरे महाविकास आघाडीत आहेत. त्यामुळे ही जागा ठाकरे गटाला जाणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र 2019 ला साळवी यांना जोरदार टक्कर देणारे अविनाश लाड हे काँग्रेसकडून या मतदार संघातून पुन्हा इच्छुक आहेत. त्यांनी या मतदार संघावर दावा करताना साळवी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह! मुलींच्या सुरक्षेसाठी काय आहे पंचशक्ती अभियान?

अविनाश लाड हे रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते नवी मुंबई महापालिकेच माजी उपमहपौरही राहीले आहेत. शिवाय त्यांनी राजापूर विधानसभेची निवडणुकही लढवली होती. मात्र चुरशीच्या लढतीत त्यांचा पराभव झाला होता. आता ते या मतदार संघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहेत. या मतदार संघावर दावा करताना लाड म्हणाले की शिवसेना फुटली आहे. अर्धी शिवसेना गेली आहे. जी सेना उरली आहे ती रोज शिंदे गट घेवून जात आहे. अशा वेळेला त्यांच्याकडे राहीले काय? असा प्रश्न लाड यांनी केला आहे. 

ट्रेंडिंग बातमी - पुण्यात चाललंय काय? धावत्या स्कूल व्हॅनमध्ये 2 चिमुरडींवर अत्याचार, तर बापानेच लेकीवर केला...

त्यामुळे राजापूर विधानसभा मतदार संघ हा काँग्रेसला मिळाला पाहीजे असे त्यांनी सांगितले. लोकसभेला विनायक राऊत यांचे काम कुणी केले हे जगजाहीर आहे. काँग्रेस कार्यकर्ते राऊत यांच्यासाठी झटले असं ही ते म्हणाले. राऊत यांना जे लिड मिळाले ते काँग्रेसमुळे मिळाल्याचा दावाही त्यांनी केला. असं असतानाही राजन साळवी उमेदवारी मागत आहे. त्यांना उमेदवारी कशी मिळू शकते असा प्रश्नही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला आहे. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'अजित पवारांनी भ्रष्टाचारी वृत्तीची पिढी तयार केली' दादांचा खंदा समर्थक भडकला

ज्याचा आमदार त्याची ती जागा असे धोरण महाविकास आघाडीचे ठरले आहे. त्यानुसार राजापूर मतदार संघ हा शिवसेना ठाकरे गटाच्या पारड्यात पडेल अशी स्थिती आहे. असं असलं तरी त्यात अजून एक निकष लावण्यात आला आहे याची आठवण लाड यांनी या निमित्ताने करून दिली आहे. ती म्हणजे जागा जिंकण्याचा निकष. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळावी असा आग्रह लाड यांनी धरला आहे. शिवाय गेली 15 राजन साळवी हे आमदार आहेत. पण त्यांनी राजापूरकरांना काय दिले असा सवाल केला आहे. इथं नवीन लोक येत आहेत. जमीनी खरेदी करत आहेत. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय विधानसभा लढण्याचेही संकेत त्यांनी दिले.